esakal | संकट समयी सरसावले शेकडो ‘हात’
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

‘कोरोना’मुळे एकवीस दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’ केल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत गरजवंतांना घरपोच मदत करण्यासाठी ‘हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच इतर संघटना, समाज सेवकांचेही मदतीसाठी हात सरसावले आहेत.

संकट समयी सरसावले शेकडो ‘हात’

sakal_logo
By
जगदिश जोगदंड

पूर्णा (जि.परभणी) : ‘कोरोना’मुळे एकवीस दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’ केल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांवर उपासमारीची वेळ आल्याने खऱ्याखुऱ्या गरजवंताला मदतीचा हात देण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. अश्या गरजवंतांना घरपोच मदत करण्यासाठी ‘हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 या उपक्रमातर्गत दानशूर व्यक्तींना आर्थिक व धान्याची मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. सदरील मदतही शहरातील सुमन मंगल कार्यालयात जमा करून गरजूंची शहानिशा करून वाटप करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, गोडतेल व दोन प्रकारच्या डाळीचे पॉकेट अश्या प्रकारचे साहित्य घरपोच देण्याचे नियोजन करण्याचे ठरले. ॲड. सय्यद अब्बास हूसेन शेख अतिक, संतोष एकलारे, ॲड. राजेश भालेराव, शेख अफसर, हाजी इरफान खुरेशी, मुन्ना राठोड, हमीद भाई बागवान, रवी जैस्वाल यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. 

हेही वाचा- भारनियमनामुळे ग्रामस्थ करतायत गर्दी !


साहित्यांची पॅकिंग
आलेले साहित्य जमा करून प्रति कुटुंबाप्रमाणे पॅकिंग करण्यात येत आहे. त्यासाठी स्वयंसेवक मदत करीत आहेत. अजून दोन दिवस साहित्य जमा करण्यात येणार आहे. ज्या सहृदयी व्यक्तींना मदत करावयाची इच्छा असेल त्यांनी ॲड. सय्यद अब्बास हुसेन  सुमन मंगल कार्यालय येथे संपर्क साधावा व आर्थिक अथवा धान्याची मदत स्वइच्छेने जमा करावी, असे आवाहन ‘हात मदतीचा’ च्या वतीने करण्यात आली आहे.

मस्तान पुरा येथे अन्नधान्य वाटप
नगर सेवक हाजी खुरेशी यांनी मस्तान पुरा येथे गोरगरीबांसाठी अन्न धान्य वाटप केले. गहू , तांदूळ, दाळ, गोडतेल, साखर,
चहापत्ती आवश्यक धान्य वाटप केले. या वेळी बाबा पठाण, शेक इलियास, शेक सलीम, सय्यद  मतीन, अब्दुल लतीफ, महमद जमील, मोसीन पठाण, नसीर पठाण, फेरोज दुबई आदी उपस्थित  होते. बसस्थानक परिसरात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सय्यद अली यांनी स्वखर्चाने जीवनावश्यक साहित्याचे गोरगरिबांना वाटप केले.

हेही वाचा- जिल्हा न्यायालयाने घेतला हा महत्वाचा निर्णय
छावा संघटनेचे प्रशासनाला पत्र
 दरम्यान या लढाईत महसूल, आरोग्य व पोलिस प्रशासनासोबत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. काही भागात कार्यकर्ते पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. ज्या भागात जिल्हा प्रशासनाला  गरज वाटेल त्याठिकाणी काम सांगावे. जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहोत, अशी माहिती अखिल भारतीय छावा संघटनेच्या युवा विभागाचे जिल्हाध्यक्ष गजानन मारोतराव सवराते यांनी दिली. तसे त्यांनी प्रशासनाला पत्रही दिले आहे.

खाकी वर्दीतही माणूस
खाकी वर्दीतही माणूस असतो याचा विसर जनतेला पडू नये असे आवाहन येथील पोलिस कर्मचारी नितीन कसबे यांनी केले आहे. आम्हालाही कुटुंब आहे. जीव आहे. पण, आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर आहोत. तुम्ही शिस्त न पाळल्यावर काठी उगारावी लागते. त्यावेळी आम्हालाही वाईट वाटते. पण, मानवजातीच्या कल्याणासाठी हा मार्ग अवलंबावा लागतो. एखादा गरजूला आम्ही  आमच्या घासातला घासही देतो. आमच्यात कठोरपणा सोबत मानवता व हळवेपणाही असतो. त्याचीही चर्चा समाजमाध्यमानी करावी, अशी भावना येथील पोलिस कर्मचारी नितीन कसबे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केली.

loading image
go to top