Latur News : भगर सेवन केल्याने शेकडो भाविकांना विषबाधा; लातूर, परभणी, बीड जिल्ह्यांतील घटना

भागवत एकादशी आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी असलेल्या महाशिवरात्रीमुळे ठिकठिकाणी फराळाचे वाटप झाले.
भगर सेवन केल्याने शेकडो भाविकांना विषबाधा
भगर सेवन केल्याने शेकडो भाविकांना विषबाधाSakal

देवणी (जि. लातूर) : भागवत एकादशी आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी असलेल्या महाशिवरात्रीमुळे ठिकठिकाणी फराळाचे वाटप झाले. यातून भगर सेवन केल्याने लातूर, परभणी आणि बीड जिल्‍ह्यांतील एकूण ५५५ भाविकांना विषबाधा झाली. यातील सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असून काहींवर उपचार सुरू आहेत.

देवणी तालुक्यातील हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात भगर खाल्ल्याने वाघनाळवाडी व खरबवाडी येथील ४४३ जणांना विषबाधा झाली. या दोन्ही गावांत अखंड हरिनाम सप्ताहात प्रसाद खाल्ल्यानंतर काही तासांनंतर भाविकांना गरगरणे, मळमळ, उलटी, उच्च रक्तदाब व डोकेदुखीचा त्रास जाणवायला लागला. वाघनाळवाडी येथे ३१५ भाविकांना त्रास झाला तर खरबवाडीत येथेही प्रसादाच्या भगरीतूनच १२८ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली.

विद्यार्थ्यांना विषबाधा

सावंतवाडी : सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या तब्बल १५५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली. त्यांना उलटी, जुलाब व पोटात दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने सकाळी तेथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. काहींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शहरातील खासगी डॉक्टरांनीही मुलांवर उपचार सुरू केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com