रस्त्यावर थांबलेल्या पती-पत्नीचा कारच्या धडकेने मृत्यू 

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

पैठण (जि. औरंगाबाद) - नातेवाइकाचा अंत्यविधी आटोपून घरी परत जाणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला समोरून भरघाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. त्यात पती-पत्नी ठार झाले. ही घटना पैठण-शहागड मार्गावर गोपेवाडी (ता. दोन) येथे शनिवारी (ता. दोन) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

आत्माराम बाबूराव गवांदे (वय 45), मंगलबाई आत्माराम गवांदे (40, रा. माळीवाडा ता. गंगापूर) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, की हे दांपत्य नवगाव (ता. पैठण) येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून दुचाकीवर आपल्या गावी परतताना ते गोपेवाडी येथे रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी अचानक समोरून आलेल्या कारने (एमएच-20, ईवाय-7273) जोराची धडक दिली. यात ते दोघेजण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन, जखमींना तातडीने पैठण येथील शासकीय सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यावर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे "घाटी' रुग्णालयात पाठविले. तेथे उपचारादरम्यान पती-पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्री. इमले यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल किशोर शिंदे, संजय राठोड, विठ्ठल एडके, करतारसिंग सिंघल, सोमनाथ थेटे, गणेश शर्मा हे अधिक तपास करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com