शिक्षकाने पाडले पत्नीचे दात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

किल्लेधारूर : अगोदर जेवल्याने राग येऊन शिक्षकाने पत्नीचे दात पाडल्याची घटना शहरातील उदयनगर भागात रविवारी (ता. सहा) घडली. या प्रकरणी गुरुवारी (ता. 10) शिक्षक पतीविरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

अनुरथ मारुती मोरे (तेलगाव, ता. धारूर, ह. मु. उदयनगर, धारूर) असे मारहाण करणाऱ्या व गुन्हा नोंद झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. अनुरथ मोरे हा चोंडी गावातील वस्तीवरील शाळेत शिक्षक आहे तर त्याची पत्नी गावंदरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर सहशिक्षिका आहेत. रविवारी रात्री साडेआठ वाजता शिक्षिकेचे भाऊ त्यांच्याकडे आल्याने त्यांनी त्याच्यासोबत जेवण केले. नोकरीवरून आलेल्या अनुरथला पत्नी आपल्या अगोदर जेवल्याचा राग आला. त्याने पत्नीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. यातच पत्नीचे समोरील दात पडले. एवढ्यावरच न थांबता अनुरथने तिला मुलासह घराबाहेर हाकलून दिले. 

उपचार घेतल्यानंतर ता. दहा जानेवारी रोजी पत्नीने धारूर पोलिस ठाणे गाठून अनुरथविरोधात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार आर. के. जाधव तपास करीत आहेत. 

Web Title: husband breaks wife teeth at Beed