पत्नीच्या आत्महत्येनंतर संपविली जीवनयात्रा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

रेणापूर (जि. लातूर) - पत्नीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या पाहिल्यानंतर पतीने सासरे व नातेवाइकांशी मोबाईलवर संपर्क साधून "मी तरी आता कशाला जगू,' असे म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली.

रेणापूर (जि. लातूर) - पत्नीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या पाहिल्यानंतर पतीने सासरे व नातेवाइकांशी मोबाईलवर संपर्क साधून "मी तरी आता कशाला जगू,' असे म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली.

घनसरगाव (ता. रेणापूर) येथे ही घटना घडली. संदीपान गिरी (वय 48) यांच्या पत्नी सरोज यांनी बुधवारी रात्री (ता. 4) गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीपान झोपेतून जागी झाल्यानंतर त्यांनी पत्नीने गळफास घेतल्याचे पाहिले. संदीपान यांनी सरोज यांच्या वडिलांना फोन लावून "तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मी तरी आता कशाला जगू,' असे सांगितले. संदीपान यांनी त्यांच्या जावयालादेखील फोन करून सरोज यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. सासरे व सर्व नातेवाइकांनी संदीपान यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु संदीपान यांनी कोणाचेही न ऐकता गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Web Title: Husband committed suicide after wife suicide in Latur district