पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

पत्नीचा खून करून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील अचलेर येथे सोमवारी सकाळी घडली आहे. लोहारा तालुक्यातील अचलेर येथे दत्तुसिंह राजेंद्र ठाकूर (वय 35) हा पत्नी संगीता ठाकूर (वय 32) दोन मुली व एका मुलासह राहत होता.

उस्मानाबाद : पत्नीचा खून करून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील अचलेर येथे सोमवारी सकाळी घडली आहे. लोहारा तालुक्यातील अचलेर येथे दत्तुसिंह राजेंद्र ठाकूर (वय 35) हा पत्नी संगीता ठाकूर (वय 32) दोन मुली व एका मुलासह राहत होता.

काही दिवसांपासून पती-पत्नींमध्ये काही कारणावरून सतत कुरबुरी होत होत्या. अखेर या सततच्या वादाचे पर्यवसन दोघांच्या मृत्यूत झाले. रविवारी रात्री मुलं झोपल्यानंतर राजेंद्र ठाकूर याने पत्नी संगीताला जबर मारहाण करत जखमी करून तिचा खून केला. यानंतर त्याने स्वतः देखील गळफास घेवून आपले जीवन संपवले. पहाटे मुलं झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शेजार्‍यांनी घरात पाहिले असता, दोघांचाही मृत्यू झाल्याचे दिसून आले.

संगीता ठाकूर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तर राजेंद्र ठाकूर याने गळफास घेतल्याचे चित्र घरात दिसून आले. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे मुलांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमधुन हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची बातमी मुरूम पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत व घटनेची नोंद घेतली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Get Suicide After Wife Murder