गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

गर्भवती पत्नीचा निर्घृण खून करण्याऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही चौधरी ईनामदार यांनी शुक्रवारी (ता. २५) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
court
courtesakal
Summary

गर्भवती पत्नीचा निर्घृण खून करण्याऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही चौधरी ईनामदार यांनी शुक्रवारी (ता. २५) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जालना - गर्भवती पत्नीचा (Pregnant Wife) निर्घृण खून (Murder) करण्याऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही चौधरी ईनामदार यांनी शुक्रवारी (ता.२५) जन्मठेपेची शिक्षा (Punishment) सुनावली आहे. चामरिया बदिया बारेला (वय २७ वर्ष रा. शिवल ता. नेपानगर, जि . बुऱ्हानपुर) असे या आरोपीचे नाव आहे.

जाफराबाद तालुक्यातील गोरखेडा येथील मारोती संपत कबंळे यांच्या शेतात चामरिया बारेला हा पत्नीसोबत सालगडी म्हणून शेतात काम करत होता. ता. चार जानेवारी २०२१ रोजी चामरिया बारेला याने गर्भवती पत्नी संगीता हिच्या चारित्र्यावर संशय घेवून तीला पोटावर, पाठीवर, तोंडावर व शरीराच्या इतर भागावर काठीने गंभीर मारहाण करून ठार केले. या प्रकरणी शेतमालकाच्या फिर्यादीवरुन जाफराबाद पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणी आरोपीला ताब्यात घेवून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयामध्ये या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासिक अंमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद एेकल्यानंतर पुढे आलेल्या सक्ष पुराव्यावरून आरोपी चामरिया बदिया बारेला याला जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती जयश्री सोळंके यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com