पत्नीनेच केली पतीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कोदामेंढी - मौदा तालुक्‍यातील वाकेश्‍वर येथील संजय चवळे यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह सहा जणांना अरोली पोलिसांनी अटक केली आहे. संजय चवळेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी दीडशेहून अधिक लोकांच्या साक्षी नोंदविल्या. प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच ठोस पुराव्यांच्या बळावर पोलिसांनी ही कारवाई केली. 

दर्शना संजय चवळे, गणेश तुळशीराम पुडके, नंदकिशोर सीताराम सपाटे, ईश्‍वर भोजराम सपाटे, महेश सुभाष वडीचार, पवन छन्नू नागरीकर (सर्व रा. वाकेश्‍वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना (ता. १६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संजयची हत्या का केली आणि कशी केली, याबाबत माहिती मिळणार आहे. संजय याने कर्जपोटी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी पत्नी दर्शनाला अटक करताच वाकेश्‍वरमध्ये खळबळ उडाली. 

मृत संजय चवळेचा मृतदेह (ता. ९ डिसेंबर २०१७) शेतात आढळला. संजयच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी व अरोली पोलिस यांनी गावात तळ ठोकला होता. दरम्यान गावात रात्री ८ वाजतानंतर शांतता पसरत होती. गावातील कार्यक्रम कसे साजरे करावे हा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला होता संपूर्ण प्रकरणावर पोलिस अधीक्षक (ग्रामीण) शैलेश बलकावडे यांनी लक्ष घातले होते. 

आत्महत्येचा  केला बनाव 
८ डिसेंबर २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास संजय चवळेची घरीच हत्या करून त्याला शेतात फेकण्यात आले. आत्महत्येचा दिखावा करण्यासाठी त्याच्या गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळलेला अवस्थेत ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे मी कर्जापोटी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्याच्या मृतदेहासमोर ठेवण्यात आली होती. दोन दिवस संजयच्या आत्महत्येचे नाट्य रंगले. मात्र, पोलिसांनी हत्या झाल्याचे सांगताच वेगळे वळण मिळाले.

Web Title: Husband murder

टॅग्स