नवरा नसतानाही पत्नी होऊ शकते गरोदर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

विभक्त पतीपासून पत्नीला गर्भधारणेचा अधिकार असल्याचा निर्णय येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. विभक्त असलेल्या पत्नीने पतीपासून गर्भधारणा व्हावी, असा दावा न्यायालयात दाखल केला होता.

नांदेड - विभक्त पतीपासून पत्नीला गर्भधारणेचा अधिकार असल्याचा निर्णय येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. विभक्त असलेल्या पत्नीने पतीपासून गर्भधारणा व्हावी, असा दावा न्यायालयात दाखल केला होता.

शहरातील डॉक्‍टर महिलेचा मुंबईतील डॉक्‍टरशी २०१० मध्ये विवाह झाला. या दांपत्याला एक मुलगा आहे. दरम्यान, पत्नीपासून फारकत मिळावी म्हणून पतीने मुंबई येथे प्रकरण दाखल केले. प्रकरणात होणारा विलंब पाहता पतीपासून मूल व्हावे, अशी इच्छा व गरज दाखवणारा अर्ज पत्नीने न्यायालयात दाखल केला.

कौटुंबिक न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून, पुरावा, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र पाहून अर्जदार महिला ही विभक्त पतीपासून गर्भधारणेची मागणी करू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायाधीश स्वाती चव्हाण यांच्यापुढे कामकाज झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Wife Pregnancy rights court