विम्याच्या पैशासाठी मुलाच्या मदतीने पतीचा खून

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नांदेड, ता. २५ : पैश्‍ााच्या देण्याघेण्यावरून मुलाच्या मदतीने पत्नीने पतीचा जाळून निर्घृण खून केला. ही घटना नायगाव तलुक्यातील कांडाळा येथे गुरूवारी (ता. २३) सायंकाळी सातच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

नायगाव तालुक्यतील कांडाळा येते राहणारा रामचंद्र इरबा पिल्लेवाड (वय ४५) हे गुरूवारी (ता. २३) सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या अंगणात बसले होते. त्यांना नुकताच विम्याचे पैसे मिळाले होते. या पैश्‍ााच्या देवाणघेवाणीवरून पत्नी- पत्नी यांच्यात वाद झाला. यावेळी पत्नी रेणूका हीने आपला मुलगा संभाजी याच्या मदतीने अंगणात बसलेल्या पतीच्या अंगावर रॉकेलचा डबा खाली केला. लगेच काही समजण्याच्या आत त्याला पेटवून दिले.

यात तो गंभीर भाजून जागीच मृत पावला. दिगांबर इरबा पिलेल्वाड यांच्या फिर्यादीवरुन पत्नी रेणूका व मुलगा संभाजी पिलेवाड यांच्याविरुध्द रामतिर्थ ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. टी. जाधव हे करीत आहेत. 
 
Web Title: Husband's blood with the help of a child for insurance money

टॅग्स