वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाची बोलेरोला धडक 

दिलीप दखने
शुक्रवार, 18 मे 2018

वडीगोद्री (जालना) - अंबड तालुक्यातील वडीगोद्रीजवळ सुसाट वेगाने धावणारा वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने बोलेरोला धडक दिली. सकाळी 11च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू आहे. या महामार्गवरील वडीगोद्री पेट्रोल पंपाजवळ उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने, वाहतूक कोंडी झाली होती. याच दरम्यान औरंगाबादकडून सुसाट वेगाने वाळू वाहतुक करणारा हायवाचा चालक कपिल राठोड, (रा. औरंगाबाद ) याचा वेगावरील ताबा सुटल्याने सोमरच्या बोलेरोवर तो धडकला. यात बोलेरोचे नुकसान झाले आहे.

हायवाच्या क्रमांकांवर खाडाखोड केलेली असल्याने तसेच नंबरप्लेचवरिल काही अंक गायब असल्याने हायवाचा खरा नंबर हा ओळखणे अवघड झाले आहे.

Web Title: hyva truck collides with Bolero