esakal | मी पाप केले नाही, आता वेगळा विचार करणार - निवृत्ती महाराज इंदुरीकर, बीड जिल्ह्यात घोषणाबाजी... 
sakal

बोलून बातमी शोधा

काल्याचे कीर्तन करताना निवृत्ती महाराज इंदुरीकर

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील कुंभारवाडी येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे रविवारी (ता. 16) कीर्तन झाले. या वेळी इंदुरीकर महाराजांनी सध्या उद्‌भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केले. या वेळी इंदुरीकरांना पाठिंबा म्हणून युवकांनी बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. 

मी पाप केले नाही, आता वेगळा विचार करणार - निवृत्ती महाराज इंदुरीकर, बीड जिल्ह्यात घोषणाबाजी... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कडा (जि. बीड) - मागील 30 ते 35 वर्षांपासून मी वारकरी संप्रदायाची मनोभावे सेवा करीत आलो. कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीचे अखंड कार्य करत आहे. हे काम म्हणजे काही पाप नाही. मी घरच्यांसाठी कमी व समाजासाठी जास्त वेळ देत आहे. ते चुकीचे वाटत असेल तर मला वेगळा विचार करावा लागेल, असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी कुंभारवाडी (ता. आष्टी) येथे रविवारी (ता. 16) केले. 

संत बाळूदेव महाराज यांच्या स्मरणार्थ आष्टी तालुक्‍यातील कुंभारवाडी येथे अनेक वर्षांपासून ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सप्ताह सोहळा रविवारी (ता. नऊ) ते रविवारपर्यंत (ता. 16) विविध महाराजांचे कीर्तन व प्रवचन झाले.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे रविवारी (ता. 16) काल्याचे कीर्तन ठेवण्यात आले. इंदुरीकर महाराज हे कुंभारवाडी येथे काल्याचे कीर्तनाला मागील दहा वर्षांपासून न चुकता येतात. दरम्यान, काही विघ्नसंतोषी लोकांना हे काम आवडत नसल्याने ते मला अडचणीत आणण्याचे काम करत आहेत, असे इंदुरीकर महाराज यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

दरम्यान, निवृत्ती महाराज यांना अडचणीत आणण्याचे काम काही नागरिक करत असून ते आम्ही खपवून घेणार नाहीत, असे म्हणत कुंभारवाडीसह परिसरातील अनेक गावांतील युवकांनी हातात बॅनर घेत इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करत घोषणाबाजी केली. या वेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

loading image