वडिलांवर अंत्यसंस्कारानंतर अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर, घरचं दु:ख मागे सारून लोकांचे अश्रू पुसले

Dharashiv News Updates : वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीला आयएएस अधिकारी गेल्यानं सध्या त्यांच्या कार्यतत्परतेचं कौतुक होतंय.
Officer Balances Duty and Personal Loss – Praised for Commitment

Officer Balances Duty and Personal Loss – Praised for Commitment

Esakal

Updated on

मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे गंभीर अशी पूरस्थिती काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी युद्धपातळीवर सर्वसामान्यांच्या मदतीसाठी झटत होते. अनेक गावांमध्ये अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफची पथके कार्यरत होती. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला जात होता. धाराशिवमधील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांनी अधिकारी कसा असावा हे दाखवून दिलंय. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ते हजर राहिले. वडिलांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष पूरग्रस्तांना मदतीसाठी धावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com