esakal | इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाना
sakal

बोलून बातमी शोधा

34Maha_Devendra_Fadnavis_must_0

काळजीवाहू मुख्यमंत्री असताना कोणाच्याही मदतीची वाट न पाहता दहा हजार कोटींची मदत केली होती. जर सरकारमध्ये इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, असा निशाना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला.

इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाना

sakal_logo
By
गणेश पिटेकर

उस्मानाबाद : काळजीवाहू मुख्यमंत्री असताना कोणाच्याही मदतीची वाट न पाहता दहा हजार कोटींची मदत केली होती. जर सरकारमध्ये इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, असा निशाना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला. उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.२०) ते बोलत होते. श्री.फडणवीस म्हणाले, की दौंड तालुक्यात गेलो होतो. तेथे आठ दिवस झाले तरी प्रशासन पोचलेले नाही. निमगाव अशा अनेक ठिकाणी गेलो. परंडा या तालुक्यात नुकसान झाले आहे.

सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची टीका

शेती खरडून गेली आहे. तेथे पुन्हा पिक घेणे शक्य नाही. वाहून गेलेला गाळ विहिरीत गेला आहे. ड्रिप वाहून गेले आहे. मका, ऊस व फळबागांचे नुकसान झाले आहे. सरकारने तात्काळ पंचनामा संपवून मदत करावी. माध्यमातील वृत्तानुसार काहींना चार साडेचार हजार रुपयांची मदत झाल्याचे दिसले. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावर टीका करताना श्री फडणवीस म्हणाले, काल मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. त्यातून काही दिलासा मिळालेला नाही. आता उपमुख्यमंत्री व त्यांना मदत करण्याची संधी आहे. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री यांची चित्रफीत दाखवली. आता संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सगळ केंद्राकडे टोलवले जाते. केंद्राने हे केले पाहिजे ते केले पाहिजे. मला याचे आश्‍चर्य वाटते.

लाव रे तो व्हिडिओ, राज ठाकरेंची स्टाईल कॉपी करणार देवेंद्र फडणवीस

शरद पवारांचे कौतुक
श्री.फडणवीस यांना शरद पवारांविषयी विचारले असता ते म्हणाले, मदत मिळायला एक महिना लागेल. यामुळे संपूर्ण गोष्टीला वेळ लागणार आहे. याची कल्पना पवार यांना आहे. पहिल्यांदा राज्य सरकार नुकसानीचे मूल्यमापन करते. त्यानंतर केंद्रीय पथक येते. एसडीआरएफमधून राज्य सरकार खर्च करते. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हे निश्‍चित करा. कर्ज काढतो म्हणजे फार मोठ पाप करतो असे नाही. आतापर्यंत राज्याने साठ हजार कोटी कर्ज घेतले आहे. जीएसटी संदर्भात यापूर्वी देखील मार्चपूर्वीचे अनुदान केंद्राने दिला आहे. आता राज्य सरकारने पदरचा खर्च केला तर तो पैसा परत येतो. तुम्ही राजकीय बोलाल तर मी राजकीय बोलणार. मला राजकारणात रस नाही. दर तीन महिन्याने जीएसटीमधील कमतरता केंद्र भरुन देते. कोरोनामुळे केंद्रावरही संकट आहे.

अडचणी निश्‍चित आहेत. महाराष्ट्राला दहा हजार कोटी उभे करणे शक्य नाही. या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न आहे. नियम काय आहेत त्यांना माहित आहे. ते सरकारचा बचाव करत आहेत. मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही. ते बाहेर निघत नाही. केंद्र सरकार भेदभाव करत नाही. उद्धव ठाकरे बोलले तरी मदत मिळणार आहेच. त्यांनी केलेली मागणीची मी आठवण करुन दिली आहे. राज्याची पत चांगली आहे. कर्ज काढले पाहिजे. या सरकारने रेल्वेबाबत भूमिक बदलली पाहिजे. पवार साहेब कधी चुकीचे बोलत नाहीत. केंद्र सरकारने सर्व हमीभाव वाढवलेला आहे. या सरकारने जलयुक्तची चौकशी करावी, असे आवाहन श्री फडणवीस यांनी केले.

loading image