बायकोच्या रागीटपणापासून अशी मिळवा सुटका... 

टीम ई सकाळ
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अतिशय सरळ स्वभावाच्या आणि निगर्वी, सहनशील स्वभावाच्या या संताची पत्नी मात्र अतिशय रागीट स्वभावाची होती. त्या गावात तिला भांडकुदळ आणि कजाग म्हणून ओळखली जात असे. 

एका देशात एक प्रसिद्ध संत होऊन गेले. त्यांचं नाव होतं सुकरात. आपल्या शांत स्वभावासाठी ते फार प्रसिद्ध होते. जगभरात त्यांच्या ज्ञानीपणाचा आणि संतत्वाचा बोलबाला होता. गावोगावचे लोक त्यांच्याकडे सल्ला मागायला येत. सुकरातही आपल्या परीने त्यांना मार्गदर्शन करत. 

आपल्या या प्रसिद्धीचा त्यांना किंचितही गर्व नव्हता. अतिशय सरळ स्वभावाच्या आणि निगर्वी, सहनशील स्वभावाच्या या संताची पत्नी मात्र अतिशय रागीट स्वभावाची होती. त्या गावात तिला भांडकुदळ आणि कजाग म्हणून ओळखली जात असे. 

सेक्सबद्दल स्वतःहून बोलत नाहीत बायका, पण... 

अगदी लहानसहान गोष्टींवरून ती वाद उकरून काढत असे. सुकरात यांच्याशी कचाकचा भांडत असे. पण ते शांत राहत. बायकोच्या कुठल्याही शिव्याशापांना ते अजिबात उत्तर देत नसत. तिनं काहीही केलं तरीही शांत राहण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले होते. 

एका दिवशी त्यांच्याकडे त्यांचे शिष्य मोठ्या संख्येने आले. सुकरात घराबाहेर त्यांच्याशी बोलत बसलेले होते. परमात्म्याचे आस्तित्व आणि मानवाच्या संकल्पना या विषयावर त्यांची चर्चा सुरु होती.

त्याचवेळी घरातून सुकरात यांच्या पत्नीने त्यांना हाक मारली. काम क्षुल्लकच होतं, पण चर्चेत मग्न झालेल्या सुकरात यांचं बायको मारत असलेल्या हाकांकडे लक्षच गेलं नाही. 

दोघांनी केला अत्याचार, एकाने बनवला व्हिडिओ

अखेर तिचा राग अनावर झाला आणि तरातरा घराबाहेर येत तिनं सुकरात यांच्या डोक्यावर घागरभर पाणी ओतून दिलं. शिष्यांना फार वाईट वाटलं. सुकरात यांनी शिष्यांच्या खाली गेलेल्या माना पाहून ओळखलं. ते अतिशय शांतपणे म्हणाले, ''पाहा पाहा... माझी पत्नी किती उदार आहे पाहा, जिने या भयंकर गरमीमुळे मला आलेला घाम पाहून माझ्यावर पाणी टाकलं. आता मला शीतलतेची अनुभूती होत आहे.''

आपल्या गुरूंच्या सहनशीलतेपुढे शिष्य विनम्र झाले. त्यांनी गुरूला नमस्कार केला. हे सगळं पाहून त्यांच्या बायकोचा राग शांत झाला.

बायको कितीही रागावली, तरी तिच्याशी शांतपणे बोला. तिचा रागही शांत होईल आणि वाद विकोपाला जाणार नाही. दोघांनीही रागावलं, तर शांतता येणार नाही. त्यामुळे एकाला राग आला, की दुसऱ्याने शांत राहिले, तरच संसार सुखाचे होतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Your Wife Is Angry Then Be Cool Husband Aurangabad News

टॅग्स
टॉपिकस