सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; 98 जणांना अटक

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष गुन्हे पथकांनी जिल्हाभरात 1 ते 29 डिसेंबरदरम्यान अवैध धंद्यावर कारवाई केली. या कारवाईत 115 गुन्हे दाखल करून 98 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून जवळपास सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

नांदेड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष गुन्हे पथकांनी जिल्हाभरात 1 ते 29 डिसेंबरदरम्यान अवैध धंद्यावर कारवाई केली. या कारवाईत 115 गुन्हे दाखल करून 98 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून जवळपास सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशावरून वर्षाच्या सरतेशेवटी आपल्या जिल्ह्यात विशेष गुन्हे पथकाची व भरारी पथकाची स्थापना केली. या पथकाद्वारे जिल्ह्यातील विविध भागात देशी दारु, हातभट्टी, सिंदी, विदेशी दारु, रसायन आदी अवैध धंद्यावर कारवाई केली. या पथकांनी 115 गुन्हे दाखल करून 98 आरोपींना अटक केली. तर 25 गुन्हे बेवारस दाखल झाले. या कारवाईत 352 लिटर हातभट्टी दारु, अडीच हजार लिटर रसायन, साडेतीनशे लिटर देशी दारु, सातशे लिटर विदेशी मद्य, परराज्यातून आलेले 20 लिटर मद्य, ताडी दीड हजार लिटर आणि नऊ दुचाकी असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

जिल्ह्यात सर्वच भागात भरारी पथकांमार्फत अवैध धंद्यावर कारवाई सुरू आहे. येणाऱ्या नवीन वर्षात अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांनी केले. विशेष करून किनवट, माहूर, धर्माबाद, नांदेड, कुंडलवाडी, देगलूर, हिमायतगर या भागात अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात हेत असल्याने विशेष पथक २४ तास गस्तीवर राहणार आहे. 

Web Title: Illegal Business Six lakh seized 98 people arrested

टॅग्स