परभणी : अंबरवाडी शिवारात अवैध दारू पकडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

परभणी : अंबरवाडी (ता.जिंतूर) येथील एका इसमास अवैध दारू घेऊन जात असताना बुधवारी (ता.सहा) पहाटे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी दारुचे चार बॉक्स हस्तगत केले आहेत.

परभणी : अंबरवाडी (ता.जिंतूर) येथील एका इसमास अवैध दारू घेऊन जात असताना बुधवारी (ता.सहा) पहाटे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी दारुचे चार बॉक्स हस्तगत केले आहेत.

अंबरवाडी (ता. जिंतूर) येथील रहिवासी सुनिल शिकलकर हा अवैधरित्या देशी दारू घेऊन जात होता. याची माहिती बामणी पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा रचून पहाटे सहा वाजता त्यास अंबरवाडी शिवारात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मोटारसायकल व देशी दारुचे चार बॉक्स जप्त करण्यात आले. 9 हजार 600 रुपयांची दारू व मोटारसायकल असा 29 हजार 600 
रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई उपविभागीय अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामोड, राठोड, पोलिस शिपाई चौधरी यांनी केली.
 
Web Title: illegal liquor caught by police in ambarwadi in parbhani

टॅग्स