अवैध दारूविक्री करणाऱ्यांना ना रेशन, ना ग्रामपंचायतीचे कागदपत्रे

आशिव ग्रामपंचायत कार्यालय (ता.औसा, जि.लातूर)
आशिव ग्रामपंचायत कार्यालय (ता.औसा, जि.लातूर)
Updated on
Summary

गेल्या आठ दिवसांपूर्वी दारूच्या नशेत एका पित्याने स्वतःच्या दीड वर्षांच्या चिमुकलीला पाण्याच्या हौदात टाकून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

बेलकुंड (जि.लातूर) : आशिव (ता.औसा) Ausa येथील ग्रामपंचायतीने Ashiv Grampanchayat गावातील अवैध दारुविक्री रोखण्यासाठी पुढाकार घेऊन गावात अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचे कुठलेही कागदपत्रे व स्वस्तधान्य दुकानाचे रेशन न देण्याचा ठराव घेतला आहे. आशिव येथे गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारूविक्री Illegal Liquor Selling मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे गावात मद्यपींची संख्या वाढली असून तंट्यांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तळीराम मद्यप्राशन करून कुटुंबीयांसह गावातील ग्रामस्थांना मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे गावातील तंट्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी दारूबंदी खाते व पोलिस प्रशासन अवैध दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई करीत नसल्याने येथील संतप्त महिलांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांला चोप दिला होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी दारूच्या नशेत एका पित्याने स्वतःच्या दीड वर्षांच्या चिमुकलीला Latur पाण्याच्या हौदात टाकून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. परिणामी गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. illegal liquor sellers won't get ration, gram panchayat documents

आशिव ग्रामपंचायत कार्यालय (ता.औसा, जि.लातूर)
नांदेडची कन्या ‘भाग्यश्री’ ची पॅरा ऑलिंपिकसाठी भरारी

यावर तोडगा काढण्यासाठी सरपंच गोविंद मदने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवा म्हणून उपसरपंच रमेश वळके यांनी गावात अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांना स्वस्त धान्य दुकानात मिळणारे रेशन व ग्रामपंचायत कार्यालयातून देण्यात येणारे कागदपत्रे यापुढे देऊ नये, असा ठराव मांडला. त्यास रेश्मा बनसोडे यांनी अनुमोदन दिले. त्यावर चर्चा होऊन तो ठराव मंजूर करण्यात आला आहे.

आशिव ग्रामपंचायत कार्यालय (ता.औसा, जि.लातूर)
पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

अवैध दारूविक्रीमुळे गावात तंटे वाढले आहेत. दारूविक्री बंद झाल्यास तंट्यांचे प्रमाण कमी होऊन गावात एकोपा वाढेल. त्यामुळे गावचा विकास साधण्यास मदत होईल. 

- गोविंद मदने, सरपंच, आशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambad Civic Body Removes Illegal Roadside Encroachments to Ease Traffic Congestion
MLC Basavaraj Patil Says He Earned Friends Across Politics, Promises Welfare for All
Gangapur Academic Achievement: Sunil Vaysal Awarded PhD in Commerce
Siddharth Nirpal secured second rank in Gangapur taluka, while Shravani Vaysal earned a place in the Chhatrapati Sambhajinagar district merit list.
Marathi News Esakal
www.esakal.com