esakal | धक्कादायक! खासगी गाड्यांवर 'महाराष्ट्र शासन' नावाचा सर्रास गैरवापर
sakal

बोलून बातमी शोधा

kalamb

धक्कादायक! खासगी गाड्यांवर 'महाराष्ट्र शासन' नावाचा सर्रास गैरवापर

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): कोणत्याही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी असला तरी त्याला स्वतःच्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी अथवा नावाचा उल्लेख करता येत नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन खात्याकडून जाहीर करण्यात आले असले तरी कळंब तालुक्यात हे नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. विविध विभागातील शासकीय कर्मचारी स्वतःच्या वाहनावर महाराष्ट्र शासन नाव व नावाची पाटी लावून बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्याकडून वाहनावर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावून फिरण्याचा फंडा कोरोना काळापासून मोठ्या प्रमाणावर वापराला जाऊ लागला आहे.

महामार्ग आणि इतरत्र होणाऱ्या पोलिस करावाईपासून वाचण्यासाठी आणि टोलपासून सुट मिळविण्यासाठी वाहनावर पोलिस, महाराष्ट्र शासन, केंद्रीय कर्मचारी, केंद्र शासन आदी पाट्या सर्रासपणे अधिकारी, कर्मचारी यांच्या स्वतःच्या वाहनावर दिसून येत आहेत. उपप्रादेशिक परिवहन यंत्रणेच्या नियमाप्रमाणे खासगी वाहनावर आशा प्रकारे नावाचा वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, तरीही अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी खासगी वाहनावर आशा पाट्या, नावे लिहून बिनधास्तपणे मिरवत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनात घसघशीत वाढ व वरकमाईमुळे चारचाकी वाहने वाढली आहेत.

हेही वाचा: 'प्रामाणिकपणाने भावाला उंचीवर नेले'; डॉ. कराडांच्या भगिनीचे मनोगत

कुठल्याही विभागात काम करणारे शासकीय कर्मचारी असो प्रत्येक कर्मचाऱ्याकडे स्वतःचे वाहन हमखास पहावयास मिळत आहे. पोलिसांनी खासगी वाहनावर पोलीस असे लिहण्यास कायद्याने बंदी आहे.अनेक पोलीस कर्मचारी या कायद्याचे उल्लंघन करून आपल्या गाड्यावर पोलीस असे लिहलेली पाटी लावतात.शासकीय कामासाठी ज्या गाड्या भाडेतत्वावर शासनाने घेतल्या होत्या;पण आता त्याचा करार संपला आहे,आशा वाहनांच्या दर्शनी भागावर व पाठीमाघेही महाराष्ट्र् शासन असे लिहले असल्याचे समोर येत आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी, पोलिस, वकील, डॉक्टर, आपल्या चारचाकी, दुचाकी गाड्यावर नावे व सिंबॉल काढतात, पण हे कायद्यानुसार नाही. अशा व्यक्तींनी नियमांची पायमल्ली केली तर कारवाही होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Corona Vaccination: उस्मानाबाद जिल्ह्यात आज गरोदर मातांनाचेही लसीकरण

कायद्याने गुन्हा आहे-

खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन, पोलीस, केंद्र शासन असे नाव लिहून फिरणे हे कायद्याने गुन्हा आहे. आरटीओ विभागाने विभागाची परवानगी असल्यासच खासगी वाहनावर नावे लिहणे योग्य आहे. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी सांगितले.

loading image