Latur Crime News : बारा गोवंशाची अवैध वाहतूक; कर्नाटकातील दोघा विरुद्ध ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल

ट्रक मध्ये बारा गोवंश क्रुर व निर्दयीपणाने भरून भरून त्याची वाहतूक करताना बिदर रोडवरील बाळासाहेब ठाकरे चौकात ग्रामीण पोलिसांनी पकडुन दोघा जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latur Crime News
Latur Crime NewsSakal

उदगीर, (जि.लातुर) : ट्रक मध्ये बारा गोवंश क्रुर व निर्दयीपणाने भरून भरून त्याची वाहतूक करताना बिदर रोडवरील बाळासाहेब ठाकरे चौकात ग्रामीण पोलिसांनी पकडुन दोघा जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी (ता.१६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रक क्र. के ए ३८, ८६१४ मध्ये जनावरे भरून घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तो ट्रक थांबून झेडपी घेतली असता या ट्रक मध्ये बारा गोवंशाची क्रुर व निर्दयपणे त्यांना त्रास होईल अशा अपुऱ्या जागेत बांधून, त्यांना वाजवी रित्या हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने बांधून वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी ताबडतोब त्याची चौकशी करून संबंधित संशयित आरोपी तुकाराम उरप्प कैकाडी (वय-४५) रा.जानवड ता.जि.बिदर, यशप्पा पुंंडलिक हलगे (वय-५५) रा.दद्दापुर ता.जि.बिदर यांच्या विरुद्ध गोवंशाची निर्दयी व क्रुरपणे वाहतुक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचे १२ गोवंश हे येथील पशुवैदक महाविद्यालय येथे पाठविण्यात आले असून ट्रक व संबंधित दोन्ही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com