मला रझाकारांची औलाद म्हणणारे, कुणाची औलाद? -इम्तियाज जलील

योगेश पायघन
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

...तर "वंचित'सोबत युती शक्‍य 
ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी अजूनही ओवेसी यांना एक फोन केला तर एमआयएम-वंचित युतीबाबत फेरविचार होऊ शकतो, असा पुनरुच्चार इम्तियाज यांनी केला. बाळासाहेब माझ्याशी बोलणार नाहीत, याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मात्र, माझी चूक त्यांनी सांगावी. मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्या घरी जाऊन आणि जाहीर सभेतदेखील मी त्यांची माफी मागेन, असे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

औरंगाबाद- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला माझ्या गैरहजेरीवरून टीका करणाऱ्यांनी मराठवाड्याला मागासलेपणातून मुक्त करण्यासाठी काय केले? इतकी वर्षे पदे भोगली, सत्तेत राहिले, आजही आहेत. मग इथला विकास का केला नाही? फक्त 17 सप्टेंबरला झेंडावंदन करणे अन्‌ देशभक्त असल्याचा ढोल बडविणे योग्य नाही. मला रझाकारांची औलाद म्हणणारे, कुणाची औलाद आहेत, असा संतप्त सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, की माझा पक्ष जरी कासीम रझवींनी स्थापन केला असला तरी रझाकार 70 वर्षांपूर्वी पाकिस्तानात निघून गेले. त्यावेळी आमच्या पूर्वजांना रझाकारांनी सोबत चालण्याबद्दल विचारले होते. मात्र, या देशावर प्रेम असल्याने त्यांनी नकार दिला. मराठवाडा मुक्तिसंग्राम हा एक इतिहास होता. त्याला मुस्लिम आणि हिंदू समुदाय वेगवेगळ्या नजरेने पाहतो. मात्र, तो घडून गेलेला इतिहास आहे. त्यात अडकून त्यावरून आता राजकारण करणे चुकीचे आहे. आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्‍न निर्माण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? मुळात या मुद्यावरून राजकारण करण्यापेक्षा माझ्यालेखी शहराचा विकास महत्त्वाचा आहे. कारण त्यासाठीच इथल्या लोकांनी मला निवडून दिल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. तसेच मराठवाडा मुक्तिदिनाच्या पुढील वर्षीच्या कार्यक्रमाला नक्की जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

...तर "वंचित'सोबत युती शक्‍य 
ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी अजूनही ओवेसी यांना एक फोन केला तर एमआयएम-वंचित युतीबाबत फेरविचार होऊ शकतो, असा पुनरुच्चार इम्तियाज यांनी केला. बाळासाहेब माझ्याशी बोलणार नाहीत, याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मात्र, माझी चूक त्यांनी सांगावी. मी त्यांचा खूप आदर करतो. त्यांच्या घरी जाऊन आणि जाहीर सभेतदेखील मी त्यांची माफी मागेन, असे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांनी हैदराबादेत जाऊन चर्चा केली तर अर्ध्या तासात मार्ग निघू शकतो. मात्र, आठ जागा देण्याच्या निर्णयावर जर ठाम राहिले तर मात्र आमचा नाइलाज असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiyaz Jaleel questioned opposition