esakal | औंढ्यातील २९ गावांत 'एक गाव एक गणपती'
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

औंढ्यातील २९ गावांत 'एक गाव एक गणपती'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंढानागनाथ: औंढा नगरीमध्ये मानाच्या सहा गणपतीची स्थापना करण्यात आली. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये २९ गावामध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा: चुकीच्या पत्त्यामुळे 'नीट' परीक्षा देणाऱ्यांची धांदल

औंढा नगरीमध्ये ६ मानाचे गणेशमंडळ आहेत. त्यामध्ये स्वामी विवेकानंद गणेश मंडळ, विश्वास गणेश मंडळ, विश्वकर्मा विजयदुर्गा गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ, इंदिरा गणेश मंडळ आणि नागनाथ गणेश मंडळाचा समावेश आहे. शहरात एकूण सोळा गणपती मंडळ स्थापन झाली.

औंढा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी कोरोना काळात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना वाद्य जोरात वाजू नये, लोकांची गर्दी होईल असे कार्यक्रमांचे आयोजन करू नका तर आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी, संस्कृतीक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे त्यामध्ये रक्तदान शिबीर, कोरोना लसीकरण आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना केल्या आहे. जवळपास २९ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनिल लांडगे, पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, जमादार अफसर पठाण, संदीप टाक, ज्ञानेश्वर गोरे, इकबाल शेख, अमोल चव्हाण, पिराजी पाचपुते, लक्ष्मण दिघाडे, राजकुमार सुर्वे, यशवंत गुरुपवार, गणेश नरोटे, प्रवीण गायकवाड आधी लक्ष ठेवून आहेत.

loading image
go to top