Beed : ‘ज्ञानराधा’त एक हजार कोटींचे ‘काळे धन’ ; सांगता येईना, सहनही होईना ,उत्पन्नाचा स्रोत नसल्याने ‘मल्टिस्टेट’ला पसंती

ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेडमधील ठेवी वाटपाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. मात्र, या मल्टिस्टेटमधील अडीच हजार कोटींपैकी एक हजार कोटींहून अधिक रक्कम ‘काळे धन’ असल्याची माहिती आहे. आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा गोळा केलेली अधिक ‘अपसंपदा’ कर चुकविण्यासाठी तसेच अधिक व्याजासाठी मल्टिस्टेटमध्ये ठेवली. मात्र, आता या मंडळींची ‘सांगता येईना अन् सहनही होईना’, अशी गत झाली आहे.
beed
beed sakal

बीड : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेडमधील ठेवी वाटपाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. मात्र, या मल्टिस्टेटमधील अडीच हजार कोटींपैकी एक हजार कोटींहून अधिक रक्कम ‘काळे धन’ असल्याची माहिती आहे. आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा गोळा केलेली अधिक ‘अपसंपदा’ कर चुकविण्यासाठी तसेच अधिक व्याजासाठी मल्टिस्टेटमध्ये ठेवली. मात्र, आता या मंडळींची ‘सांगता येईना अन् सहनही होईना’, अशी गत झाली आहे.

सहा महिन्यांपूर्वी येथील जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटमध्ये १११ कोटींच्या अनियमितताप्रकरणी गुन्हे नोंद झाले. एक वगळता सर्वच प्रमुख आरोपी फरार आहेत. साईराम अर्बनचीही परिस्थिती वाईट आहे. तर ज्ञानराधा मल्टिस्टेटमधील ठेवीवाटप चार महिन्यांपासून ठप्प आहेत. साडे सहा लाख खातेदार व अडीच हजार कोटींच्या आसपास ठेवी वाटपाबाबत व्यवस्थापनाने दिलेल्या सर्वच मुदती टळल्या आहेत. सुरेश कुटे हे लवकरच ठेवीदारांना वाटप पैसे देणार आहेत. मात्र, ‘काळे धन’ असणाऱ्यांची पंचाईत होणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

beed
Beed News : तारीख टळली; ‘ज्ञानराधा’कडून पुन्हा वेळापत्रक ; ठेवीदारांची तारांबळ,यापूर्वी दोनदा दिलेले आश्वासन हवेतच विरले

बोंब मारणेही कठीण

चार महिन्यांपासून ठेवी वाटप ठप्प झाल्यानंतर १० लाख रुपयांपर्यंत ठेवी असणारे ज्ञानराधाचे मुख्य कार्यालय, शाखा आणि अगदी कुटेंच्या घरांपर्यंत जात आहेत. कष्टाने कमावलेला पैसा या गरीब मंडळींना आता दवाखाना, मुलींचे लग्न अशा कारणांसाठी लागणार आहे. मात्र, ज्यांच्या कोटींवर रकमा आहेत ती मंडळी चिडीचुप आहे. आता ठेवी दिल्या नाही म्हटले तर हा पैसा आला कोठून, याचे उत्तर मंडळींना द्यावे लागणार आहे. त्यामुळे ‘बड्या’ ठेवीदारांची कोणाकडेच विचारणा किंवा तक्रारही नाही.

‘त्या’ ठेवीदारांची संख्या चार हजार

आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा कमावलेली ‘अपसंपदा’ अशा मल्टिस्टेटमध्ये ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. यात शहरासह राज्यातील काही उद्योजक व डॉक्टर मंडळींचा समावेश आहे. अधिकच्या व्याजाच्या अमिषासह (१३ ते १४ टक्के) कर चुकवेगिरीच्या मुख्य हेतूनेच ‘ज्ञानराधा’त ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांची संख्या चार हजारांच्या घरात आहे. अशा मंडळींच्या एक हजार कोटींहून अधिक ठेवी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com