Lok Sabha Election : उदगीरात ५८० मतदार बजावणार होम मतदानाचा हक्क - उपजिल्हाधिकारी शिंदे

लोकसभा मतदानासाठी जेष्ठ नागरिक व दिंव्यागासाठी निवडणूक आयोग राबवत असलेल्या होम मतदान सुविधेचा लाभ उदगीर मतदार संघातील ५८० मतदार घेणार आहेत.
vote
voteSakal

उदगीर, (जि.लातुर) : या वेळच्या लोकसभा मतदानासाठी जेष्ठ नागरिक व दिंव्यागासाठी निवडणूक आयोग राबवत असलेल्या होम मतदान सुविधेचा लाभ उदगीर मतदार संघातील ५८० मतदार घेणार आहेत.

हे मतदान प्रत्येकाच्या घरी जाऊन घेण्यासाठी एकूण २३ टीम नियुक्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली आहे.

यावर्षी भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील वृद्ध व दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी होम मतदानाची संकल्पना राबवत आहे. यात या संबंधित मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी त्यांचे बँलेट पेपरवर मतदान घेणार आहेत. या निवडणूक आयोगाच्या मोहिमेला उदगीर मतदार संघात प्रतिसाद मिळाला असून एकूण ५८० मतदार घरी बसून मतदान करणार आहेत.

उदगीर मतदार संघात तहसीलदार राम बोरगावकर व निवडणूक तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली बीएलओच्या माध्यमातून ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्याकडून विशिष्ट फॉर्म भरून घेण्यात आला आहे.

घरी बसून मतदान करणार की मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मतदान घेण्यात येणार आहे.यात जेष्ठ व दिव्यांग मिळून एकूण 7306 मतदार आहेत. यापैकी ८५ वर्षापेक्षा जास्त ३८१८ मतदार तर ३४८८ दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ६६७६ मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास पसंती दिली आहे.

या मतदारांचे मतदान घेण्यासाठी मतदान दिवसाच्या काही दिवस अगोदर ज्येष्ठ व दिव्यांगाच्या घरी जाऊन बँलेट पेपरवर मतदान करुन घेण्यात येणार आहे.याबाबत आयोगाकडून तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

ती तारीख निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना त्याची कल्पना देऊन घरोघरी टीम जाऊन हे होम मतदान करुन घेण्यात येणार आहे. यासाठी २३ टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत असे उपजिल्हाधिकारी श्री शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com