esakal | वसमत तालुक्यात वायरल फिवरचा जोर
sakal

बोलून बातमी शोधा

vasmat

वसमत तालुक्यात वायरल फिवरचा जोर

sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत : कोरोनाची दुसरी लाट ओसरते न ओसरते वसमत तालुक्यात डेंग्यूसदृश तापाने कहर माजवला आहे. तालुका आरोग्य विभाग डेंग्यू निगेटिव्ह असल्याचे सांगत असले तरी खाजगी दवाखान्यात मात्र डेंग्यू व डेंग्यूसदृश आजार सांगून रुग्णांना दाखल करुन घेत महागड्या उपचारांचा सपाटा लावला आहे. परिणामी आधिच कोरोना आजाराने अर्थकारण गमावलेल्या नागरीकांना नविन संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

हेही वाचा: बोल्डा फाटा येथे पोलिस,चोरट्यांचा पळापळीचा खेळ : तीघे जण ताब्यात

जुलै महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरीक व्यावसाय व इतर कामे पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोरोनाचे संकट जाते न जाते तालुक्यात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. चार ते पाच दिवस आंगात सतत ताप राहिल्याने रुग्ण भयभीत होऊन खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहेत.

रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ते बारा दिवस रुग्णालयात दाखल रहावे लागत असून, त्यासाठी उपचार व प्रयोगशाळेच्या तपासण्यावर बारा ते पंधरा हजारांचा खर्च येत आहे. सद्य परिस्थितीला शहरातील खाजगी दवाखाने रुग्णाने फुल्ल झाले आहेत. वसमत नगर परिषदेच्या वतीने शहरात धूर फवारणी करुन प्रतिबंध उपाय केला असला तरी वायरल फिवर थांबायचे नाव घेत नाही.

हेही वाचा: उस्मानाबाद: 'ई-पीक' पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने काळजीचे कारण बनले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या बाबींकडे तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

"आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील रुग्णांचे सँपल प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. परंतू सर्व अहवाल डेंग्यू निगेटिव्ह आले."- डॉ.सुनिल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वसमत.

"सध्या डेंग्यूसदृश आजार सर्वत्र आढळून येत आहे. मल्टीपल वायरल असल्याने रुग्णांमध्ये तापीचे प्रमाण आहे. रुग्णांनी घाबरुन न जाता कमी खर्चिक व कमी वेळेत बरा होणारा होमिओपॅथी उपचार करावा. होमिओपॅथी उपचाराने रुग्णांना तात्काळ फरक पडून होणारा आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास वाचेल."- डॉ.हरदास जटाळे पाटील, होमिओपॅथी तज्ञ, वसमत.

loading image
go to top