प्राप्तीकरणाच्या कर संकलन 21 टक्‍क्‍याने वाढले 

Income tax collections increased by Twenty one percent
Income tax collections increased by Twenty one percent

औरंगाबाद : नोटबंदीनंतर मराठवाड्यात करदात्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यामूळे प्राप्तीकर विभागाच्या महसूलातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर संकलनात 21 टक्‍क्‍यांने वाढ झाली, असून ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 198 कोटी रुपये जास्त आहे. प्राप्तीकरण विभागाने केलेल्या जनजागृती केल्यामूळे कर संकलन वाढल्याची माहिती प्राप्तीकर विभागाचे प्रधान आयुक्‍त के.पी.सी.राव यांनी बुधवारी (ता. 20) दिली. 

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही कर भरण्यात नागरिकांनी तत्परता दाखवली आहे. यामूळेचे विभागाच्या महसूलात घोडदौड सुरु आहेत. मराठवाड्यात गेल्या वर्षी 921.7 कोटींचे कर संकलन झाले होते. तोच आकाडा यंदा 198 कोटींनी वाढून 1119.9 कोटींवर गेला आहे. प्राप्तीकर विभागातर्फे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर जनजागृती मोहिम राबविल्यामूळे कर भरण्याची संख्या वाढली आहेत. नोटबंदीपुर्वी कर चोरी करणाऱ्यांची संख्या ही जास्त होती. नोटबंदीनंतर ही संख्या झपाट्याने वाढली. कर भरणे किती गरजेचे आहे. करचा पैसा देशासाठी वापरला जातो. यासह अनेक गोष्टी प्राप्तीकर विभागाने करदात्यांना पटवून सांगितल्यामूळे मराठवाड्यात कर भरणारे पुढे आले. गेल्या वर्षीच्या तुलनेही 21 टक्‍के वाढ दुष्काळजन्य परिस्थिती होणे लक्षणीय असल्याचेही श्री. राव यांनी सांगितले. देशाचा आदर्श नागरिक म्हणवून घ्यायचे असेल, कराची चोरी न करता सजगतेने पुढाकार घेत कर भरणा करावा. असे आवाहन प्राप्तीकर विभागातर्फे करण्यात येत आहेत. 
 

वर्ष महसूल 
1 एप्रिल 2017 ते 31 जानेवारी 2018 921.7 कोटी 
1 एप्रिल 2018 ते 31 जानेवारी 2019 1119.9 कोटी




 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com