औरंगाबादेतील शाळांवर प्राप्तीकरची करवाई 

औरंगाबादेतील शाळांवर प्राप्तीकरची करवाई 

औरंगाबाद : करचुकेगिरी केल्याच्या संशयावरुन सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्टच्या केंब्रिज स्कूल, सेंट लॉरेन्स मराठी व इंग्रजी शाळांसह जळगाव तसेच बंगळुरु येथील शाळेवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी(ता.28) कारवाई करत महत्वाचे दस्तवेज जप्त केले आहे. अधिकाऱ्यासह 45 कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत एकाच वेळी हि कारवाई केली जात असून रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन सर्व्हे सुरु होते. दरम्यान, करप्राप्त उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

कर चुकवेगिरी करणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टवर प्राप्तिकर विभागाने करडी नजर ठेवली आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागाच्या अतिरिक्त आयुक्त संदीपकुमार साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बधुवारी सायंकाळपासून येथील सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्टच्या शाळांची तपासणी केली जात आहे. यात जालना महामार्गवरील केंब्रिज स्कूल, सिडको परिसरातील सेंट लॉरेन्स मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळांसह जळगाव तसेच बंगळुरु येथील अशा मिळून या ट्रस्टच्या एकूण पाच शाळांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. औरंगाबादसह नाशिक येथील एकूण45अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकावर मार्फत एकाच वेळी ही कारवाई केली जात आहे. 

डोनेशन, प्रवेश शुल्क यासह आर्थिक व्यवहारासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी केली जात असून अनेक महत्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहे. संस्थेचे संचालक कॉलिन यांचा जबाबही घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.दरम्यान, रात्री उशीरापर्यंत हे सर्व्हे ऑपरेशन सुरु होते. याबाबत अतिरिक्त आयुक्त संदीपकुमार साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता ते उपल्बध न झाल्याने अधिकृत तपशील समजू शकला नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com