hingoli
hingolisakal

Hingoli News : सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ

थंडीचा कडाक्याने तापमानात घसरण, नागरिकांनी घ्यावी काळजी

हिंगोली : शहरात तीन - चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. रात्रीप्रमाणे दिवसाही गारठा जाणवत आहे. शहराचे किमान तापमान १४ अंशांवर पोचले आहे. त्यामुळे हिंगोलीकरांना हुडहुडी भरली असून, सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे. शहरात दोन दिवसांपासून गार वारे वाहत होते. त्यामुळे किमान तापमानात दोन अंशांची घट झाली. शहरात डिसेंबरच्या सुरवातीला किमान तापमान २२ अंशांच्या जवळपास होते. नंतर ते कमी होऊन तीन दिवसांपासून १४ अंशांवर स्थिरावले होते. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे बहुतांश भागात कमाल २६ अंश असल्याची नोंद झाली आहे.

बदलत्या वातावरणामुळे सांधेदुखीसह सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक पुरते बेजार झाले आहेत. किमान तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत आहे. आगामी पाच दिवस ढगाळ ते अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साधारणपणे आठवडाभर वातावरण असेच असेल. किमान तापमान १३ अंशांखाली राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस गार वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शहरात पहाटे धुके, सकाळी थोडेसे ऊन, अधूनमधून आभाळ, सायंकाळनंतर गारवा अशा वातावरणातील बदलांमुळे आजारांचा तापही वाढला आहे. लहान मुलांसह इतरांनाही सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी तसेच त्वचाविकारांशी संबंधित तक्रारी वाढत्या आहेत, कोरडा खोकला, सर्दी यासह विविध वयोगटात सांधेदुखीच्या तक्रारी दिसून येत आहेत. थंडीची सुरवात झाली की हा त्रास वाढताना दिसतो. खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहे. आठवडाभरापेक्षा अधिक काळ सर्दी, खोकला राहिला तर वैद्यकीय उपचार सुरू करायला हवेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

hingoli
Hingoli News : लोकअदालतीमध्ये ७३आरोपींना ४ लाख ६७ हजारांचा दंड

काही वेळा खोकला नियंत्रणात येत नाही, उलट तो वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये होणाऱ्या या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. हवेच्या खालच्या थरामध्ये स्थिर झालेल्या प्रक्षणामुळे डोळ्यांची जळजळ होण्यासह नाक व घसा खवखवतो. या वातावरणामध्ये ताप टाळण्यासाठी दरवर्षीं लसीकरण करावे, लहान मुलांमध्येही लसीकरण चुकवू नये. एसीचा वापर टाळावा, उपडद्यावरचे अन्नपदार्थ टाळावे, प्रतिजैविकांचे सेवन वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नका, गरम पाणी प्यावे तसेच ताजे अन्न खावे.

— डॉ. कैलास शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com