वाढत्‍या तापमानामुळे मूत्रमार्ग विकारांत वाढ

Temperature
Temperature

नांदेड - वाढत्या तापमानात आरोग्याच्या समस्या डोक वर काढतात. अशातच महिलांमध्ये युरिन इन्फेक्‍शनचा त्रास वाढला असून, ७० टक्के महिलांना त्रास उद्‌भवत असल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिली.

बाहेर नोकरी करणाऱ्या महिलांसोबतच महिला पोलिसांमध्ये यूटीआयचा त्रास अधिक प्रमाणात आहे. महिला पोलिसांचे अधिक कामाचे तास, पाणी कमी पिणे, शोचालय अस्वच्छ असल्याने न जाणे या कारणांमुळे या महिलांना यूटीआयचा त्रास होतो. यापैकी काही महिला पोलिसांना औषधोपचारही देण्यात आल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले. 

महिला पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्‍चित नसतात. बाहेर फिरणे, ट्रॅफिक सिग्नलवर उभे राहणे यामुळे बराच वेळ लघवी दाबून धरल्याने युरिन इन्फेक्‍शनचा त्रास होतो.

यूटीआयची लक्षणं
लघवीदरम्यान जळजळ
सतत किंवा तातडीने लघवीला जावंस वाटणं 
लघवीचा रंग गडद होणं
कंबर, ओटीपोटीत दुखणं

कोणती काळजी घ्यावी
भरपूर पाणी प्यावं
नियमित लघवीला जावं
लघवीला जाणं टाळू नये
कॉटनचे कपडे पावरावेत
घट्ट कपडे घालू नये

आठ ते दहा तास बाहेर काम करणाऱ्या महिलांना युरिन इन्फेक्‍शनचा त्रास उद्‌भवतो. कमी पाणी पिणे, खूप वेळ लघवी दाबून धरणे यामुळे हा त्रास होत असून, सद्यःस्थितीत ७० टक्के रुग्ण युरिन इन्फेक्‍शनने त्रस्त आहेत. वेळीच उपचार न केल्यास भविष्यात याचे गंभीर परिणाम होतात.
- डॉ. प्राजक्ता एस. कुलकर्णी (स्त्रीरोगतज्ज्ञ)

सॅनेटरी नॅपकिनचा संसर्ग
पॅड वापरणाऱ्या महिलांची संख्या वाढली असली तरी, त्यांच्या किमती अधिक असल्याने महिला बजेटमध्ये असणाऱ्या सॅनेटरी नॅपकिनची निवड करतात. काही कंपनीच्या सॅनेटरी नॅपकिनचा संसर्ग होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत महिलांना ग्राहक न्यायालयात तक्रार करता येते. महिला आरोग्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संगीता भालेराव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com