हिंगोलीच्या जान्हवीची इंडिया बूक ऑफ रिकार्डने घेतली दखल

हिंगोली येथील जान्हवी नितीनकुमार घुगे या विद्यार्थिनीने शैक्षणिक विषयावरील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून स्वतः तयार केलेले व्हिडिओ युट्युब चॅनेलवर प्रसारित केले
India Book of Records Janhvi Ghuge videos on educational subjects in Marathi Hindi and English on YouTube channel hingoli
India Book of Records Janhvi Ghuge videos on educational subjects in Marathi Hindi and English on YouTube channel hingolisakal

हिंगोली : हिंगोली येथील जान्हवी नितीनकुमार घुगे या विद्यार्थिनीने शैक्षणिक विषयावरील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून स्वतः तयार केलेले व्हिडिओ युट्युब चॅनेलवर प्रसारित केले. या व्हिडिओंना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे जान्हवी घुगेची इंडिया बूक ऑफ रिकार्ड संस्थेच्या २०२२-२३ या आवृत्तीमध्ये मॅक्सीमम स्पीच रियॅकटेड या लहान मुलाच्या वयोगटात नोंद घेण्यात आली आहे. हिंगोली येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत कार्यरत असलेले नितीनकुमार घुगे यांच्या जान्हवी या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच युट्युबवरील व्हिडिओ पाहण्याचा छंद लागला होता.

वडिल नितीनकुमार व आई चैताली घुगे यांनी तीची आवड व उत्साह पाहून जान्हवीने स्वतः असे काही तरी शैक्षणिक व्हिडिओ मोबाईलवर तयार करावेत, यासाठी तिला एका व्हिडिओसाठी १०० रुपये बक्षीस तिच्या पैसे जमा करण्याच्या गल्ल्यात जमा करण्यासाठी देऊ लागले होते. तिने आतापर्यंत तयार केलेल्या व्हिडिओतून तिच्या गल्ल्यात ५ हजार रुपये जमा झाले होते. दरम्यान, जान्हवीला येथील मिराताई कदम यांच्या सेवासदन विषयी माहिती देण्यात आली होती. तिने जमा केलेले पाच हजार रुपये सेवासदनला मदत म्हणून दिले. जान्हवीच्या नावाने असलेल्या युट्युब चॅनेलवर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील शैक्षणिक विषयासह वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरील व्हिडिओ तयार करून पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे तिने हे सर्व व्हिडिओ एका दमात तयार केले आहेत.

तसेच अमेरिकन शो ऑफ क्लिक या जाहिरातकंपनी द्वारा २०१८-१९ मध्ये ऑनलाइन फोटो स्पर्धा आयोजीत केली गेली होती. या स्पर्धेमध्ये जान्हवीला देशभरातील ७ हजार ऑनलाईन मते पडून यामध्ये तिचा तिसरा क्रमांक आला होता. तिच्या या कौशल्याची दखल एशिया बूक ऑफ रिकार्ड या ऑर्गनायझेशनशी संलग्नित असलेल्या इंडिया बूक ऑफ रिकार्ड संस्थेच्या २०२२-२३ या आवृत्तीमध्ये मॅक्सीमम स्पीच रियॅकटेड या लहान मुलाच्या वयोगटात नोंद घेण्यात आली आहे. जान्हवीने हिंगोली जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहचवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. दरम्यान बुधवारी पार पडलेल्या सेवासदनच्या कार्यक्रमात जान्हवी घुगेला सिनेअभिनेते मकरंद अनासपूरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com