भारत देशच खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे - पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 20 जून 2018

नांदेड : जगाच्या पाठीवर भारत देश असा एक देश आहे की त्या ठिकाणी सर्व धर्माचे नागरिक एकत्र व सलोख्याने नांदतात. जीवन जगताना माणूस म्हणून आपण जगलो तर भारत देशच खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे असे मत पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी व्यक्त केले. 

वजिराबाद पोलिस ठाण्यात ईद- ए- मिलाप आयोजीत कार्यक्रमात पोलिस अधिक्षक श्री. मीना बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, रूबी अकॅडमीचे श्री. असद यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री. मीना म्हणाले की, प्रत्येकाने कायद्याचे पालन करत आपले अधिकारी व कर्तव्याचे भान ठेवावे. आपल्या धर्मानुसार वर्तन ठेवल्यास कुठेच अनुचीत प्रकार घडणार नाही. नवतरूणांनी भविष्याचा विचार करून जीवनात मार्गक्रमण करावे असे आवाहन त्यांनी केले. स्वर्ग व नरक ही संकल्पना खऱ्या अर्थाने पहायची असेल तर भारत देशच आपला स्वर्ग असल्याचे मत व्यक्त करत श्री मीना म्हणाले की यासाठी माणसांनी माणसासारखं वागलं पाहिजे. यावेळी अभिजीत फस्के यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुता याबाबत मार्गदर्शन केले. 

Web Title: india is heaven said police superintendent chandrakishor meena

टॅग्स