औरंगाबाद विमानतळावर फडकला शंभर फूट उंच तिरंगा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

सध्या विमान कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा आहे. येत्या काळात विमान कंपन्यांकडे 900 विमाने येण्याची शक्यता आहे, असे झाले तर मराठवाड्यातून विमानसेवेला चालना मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे विमान सेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमानतळ निदेशक डी. जी. साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद येवले यांनी केले.

औरंगाबाद : भारतीय विमानतळ प्राधिकरण तर्फे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० फूट उंचावर राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

चिकलठाणा विमानतळावर उभारण्यात आलेल्या स्तंभाचा (हायमास्ट) गुरुवारी (ता. २९) उद्घाटन सोहळा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यकारी संचालक केशव शर्मा यांच्या हस्ते उदघाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विमानतळाचे निदेशक डी. जी. साळवे यांची उपस्थिती होती.

देशातील 120 विमानतळापैकी 29 विमानतळांची 100 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी निवड केली होती त्या मध्ये औरंगाबाद विमानतळ याचा समावेश करण्यात आलेला आहे वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात आले यावेळी बोलताना केशव शर्मा म्हणाले की, औरंगाबाद जागतिक वारसा असलेले शहर आहे. अजिंठा वेरूळ सारख्या लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबाद ला आकर्षित होतात. या शहरात औद्योगिकरणाची ही भरभराट आहे त्यामुळे विमान सेवेचे जाळे वाढण्यासाठी सर्वकाही असताना प्रत्यक्षात मात्र विमानसेवा वाढत नाही. यासाठी स्थानिक राजकारण आणि प्रशासनाने योग्य पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी येथे पाच वर्षात या भागात मोठ्या प्रमाणावर विमानसेवा सुरू होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सध्या विमान कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा आहे. येत्या काळात विमान कंपन्यांकडे 900 विमाने येण्याची शक्यता आहे, असे झाले तर मराठवाड्यातून विमानसेवेला चालना मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे विमान सेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमानतळ निदेशक डी. जी. साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद येवले यांनी केले.

Web Title: Indian flag on Aurangabad Airport