परळी तालुक्यात सापडले अर्भक, अज्ञात मातेने फेकले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

दैठणाघाट या गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये नुकतेच जन्मलेले अर्भक फेकून देण्यात आले होते. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरील मजुरांना ऐकावयास आल्यानंतर मिस्त्री व मजुरांनी झाडाझुडपांमध्ये स्त्रीजातीचे अर्भक रडत असल्याचे दिसून आले.

परळी वैजनाथ (जि. बीड) - तालुक्यातील दैठणाघाट येथील स्मशानभूमीच्या परिसरामध्ये स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली असून बाळाच्या रडण्यामुळे गावातील नागरिकांचे लक्ष गेल्याने बाळाचे प्राण वाचले आहेत. या बाळाला उपचारासाठी धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. 

दैठणाघाट या गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये नुकतेच जन्मलेले अर्भक फेकून देण्यात आले होते. दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरील मजुरांना ऐकावयास आल्यानंतर मिस्त्री व मजुरांनी झाडाझुडपांमध्ये स्त्रीजातीचे अर्भक रडत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या! 

गावातील नागरिकांनी याची माहिती आशा वर्कर कल्पना गुट्टे यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन बाळाला झुडपातून बाहेर काढून त्याला कपड्यामध्ये गुंडाळून धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात मातेने या मुलीस फेकून दिले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infant found in Parli taluka, thrown by unknown mother