Kej : जखमी दुर्मिळ 'हरियाल' पक्षाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केज : जखमी दुर्मिळ 'हरियाल' पक्षाला जीवदान

केज : जखमी दुर्मिळ 'हरियाल' पक्षाला जीवदान

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि. बीड) - महाराष्ट्रचा राज्यपक्षी म्हणून ओळखला जाणारा 'हरियाल पक्षी' शुक्रवार (ता.१२) रोजी सकाळी आडस शिवारातील शेतात एका शेतकऱ्याला जखमी अवस्थेत आढळून आला. यासंबंधी त्यांनी पक्षीमित्राला माहिती देऊन त्यांच्या स्वाधीन केले.

तालुक्यातील आडस शिवारातील मजिद बागवान यांना त्यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी एक पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. ते त्याच्या जवळ गेले असता पक्षी जखमी असल्याने निपचित पडून होता. यासंबंधी त्यांनी तातडीने पक्षीमित्र सुरेश शिनगारे यांना माहिती दिली. माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो हरियाल पक्षी असल्याचे सांगितले. पक्षीमित्रांने त्या जखमी पक्षाला अलगद उचलून घेऊन पाहिले असता त्याच्या पंखांच्या खालच्या भागाला जखम झाल्याने त्याला उडता येत नसल्याचे दिसून आले. लागलीच त्यांनी धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्या जखमी पक्षाला वनविभागाच्या कार्यालयात नेऊन  त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे पक्षीमित्राच्या सतर्कतेमुळे या दुर्मिळ हरियाल पक्षाची जखम बरी होऊन नव्याने आकाशात स्वच्छंदपणे भरारी घेता येण्याचे बळ मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: 'कांद्या'ला वाचविण्यासाठी केली जातेय देशी दारुची फवारणी

'हरियाल' (शास्त्रीय नाव- Treron phoenicoptera) हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनेही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे. याचे शास्त्रीय नाव ‘ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा' आहे.

इंग्रजीत त्याला ग्रीन पिजन असे म्हणतात. हिरवा कबूतर हा विविधतेने नटलेला पक्षी असून त्याचा आकार नेहमीच्या कबूतरांपेक्षा थोडे लहान आहे.

loading image
go to top