औरंगाबाद : गोंदेगाव 'मास कॉपी' प्रकरणाची चौकशी सुरु

औरंगाबाद : गोंदेगाव 'मास कॉपी' प्रकरणाची चौकशी सुरु

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रात मास कॉपी प्रकरण घडले होते. या प्रकरणासंबंधी शुक्रवारपासून (ता.14) बोर्डात विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. तीन दिवसांत 321 विद्यार्थ्यांची चौकशी होणार असून, पुढच्या आठवड्यात शुक्रवारी (ता.21) याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोर्डातर्फे सांगण्यात आले.

राज्य शिक्षण मंडळातर्फे एक ते 22 मार्च दरम्यान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान 11 मार्चला गणित भाग एक या पेपरच्या वेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या भरारी पथकाने सदरील परीक्षा केंद्रास भेट दिली असता परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्या ठिकाणी असलेल्या 13 वर्गखोल्यामध्ये असलेले 321 विद्यार्थी सामुदायिक कॉपी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भरारी पथकामार्फत 13 पर्यवेक्षक, दोन कर्मचारी व केंद्र संचालक अशा 16 जणांवर कारवाई करून चौकशी समिती गठीत केली होती.

याबाबत स. भु. संस्थेला दोषींवर कारवाई करण्याची सूचना बोर्डामार्फत करण्यात आली होती. गैरप्रकारात सहभागी असलेल्या पर्यवेक्षकांची विभागीय मंडळातर्फे चौकशी पूर्ण झालेली आहे. याबाबतचा अहवाल बोर्डाला सादर करण्यात आला आहे. 

गोंदेगाव (ता. सोयगाव) केंद्रामध्ये परिसरातील तीन विद्यालयांचे विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून बसलेले होते. त्यापैकी शुक्रवारी (ता.14) इतर दोन विद्यालयाच्या 70 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी (ता.15) व सोमवारी (ता.17) राहिलेल्या 251 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यातील शुक्रवारी (ता.21) याप्रकरणावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com