बाजारातील सॅनिटायझरची होतेय तपासणी 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायझरचा वापरावर अधिक भर दिला जात आहे. मात्र, आता मार्केटमध्ये नवनवीन कंपन्यांचे सॅनिटायझर विक्रीसाठी येत आहेत. त्यात जालन्यात कल्पना एम्पोरियम येथे छापा टाकून बोगस सॅनिटायझर आणि मास्कचा साठा जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून सतत सॅनिटायझरचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी पाच कंपन्यांच्या सॅनिटायझरचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापरणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावणे, गर्दी जाणे टाळणे आदी उपाय करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे सतत हात स्वच्छ करण्यासाठी नागरिक सॅनिटायझरचा वापर अधिक केला जात आहे.

जालन्यात ता. १९ मार्च रोजी कल्पना एम्पोरियम येथे स्थानिक गुन्हे शाखेसह महसुल आणि अन्न व औषध विभागाने छापा टाकून तब्बल सहा लाख रुपयांचे बोगस सॅनिटायझर आणि मास्कचा साठा जप्त केला होता. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात येणाऱ्या सॅनिटायझरवर अन्न व औषध प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. 

मागील दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाकडून पाच विविध कंपन्यांच्या सॅनिटायझरचे नमुने घेतले आहेत. हे पाच नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला नाही. मात्र, शहरात आणि जिल्ह्यात येणाऱ्या विविध सॅनिटाझरवर अन्न व औषध प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. 

शहरात विक्रीसाठी दाखल झालेल्या पाच विविध कंपन्यांच्या सॅनिटायझरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. 
- ए.एम. मिटकर, 
साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com