Success Story : शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आईचा मुलगा आता झाला फौजदार..!

फुलंब्री : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तिसऱ्या प्रयत्नात यश
inspiring story of navnath sankpale become Sub-inspector
inspiring story of navnath sankpale become Sub-inspector Sakal

फुलंब्री : शेतात काबाडकष्ट करून शेतमजुरी करत मुलाला उच्च शिक्षण देत फौजदार बनविण्याचे स्वप्नं फुलंब्री येथील द्रोपदाबाई संकपाळे यांचे होते. हे त्यांचे स्वप्नं नवनाथ विश्वनाथ संकपाळे या २७ वर्षीय मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पूर्ण केले असून त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी नुकतीच निवड झाली आहे.

द्रोपदाबाई विश्वनाथ संकपाळे यांनी घरची परिस्थिती हलकीच्या असतानाही शेतमजुरी करून नवनाथचे शिक्षण पूर्ण केले. नवनाथचे २०१३ मध्ये जिल्हा परिषद शाळेत दहावीचे शिक्षण पूर्ण झाले.

त्यानंतर २०१५ मध्ये पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात बारावीचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बीएससीची पदवी पूर्ण केली. आतापर्यंत नवनाथने दोन वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती.

मात्र त्यात अपयश आले. तरीही जिद्ध आणि चिकाटी वापरून आईंच्या परिश्रमाचे चीज करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. नवनाथ संकपाळे याचा भाऊ सागर संकपाळे या चहा हॉटेल चालवतो.

पोलिस उपनिरीक्षक पदी नवनाथची निवड झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याबद्दल त्याचा गावकऱ्यांच्या वतीने सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, पीएसआय श्रीनिवास धुळे, योगेश मिसाळ, गणेश राऊत, सुमित प्रधान, विशाल आढाव यांच्यासह आदींनी सत्कार केला.

..अन् आईचे डोळे पाणवले

नवनाथने ही रात्रंदिवस अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगात यश मिळविले. त्याची आता पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. ही बातमी कळताच नवनाथची आई द्रोपदाबाई संकपाळे यांचे डोळ्यातून आनंदाश्रू आले.

दोन वेळेस अपयश आले तरीही खचून न जाता आईने धीर देत पुन्हा जोमाने अभ्यास करण्यासाठी पाठिंबा दिला. वडिलांची इच्छा होती मी अधिकारी व्हावे. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवून कुठल्याही गोष्टीत खचून न जाता अभ्यास केल्याने यश नक्कीच मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा.- .

- नवनाथ संकपाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com