समांतर ऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नवीन पाईप लाईन : राज्यमंत्री अतुल सावे

प्रकाश बनकर
रविवार, 23 जून 2019

  • मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार अतुल सावे यांनी रविवारी पहिल्यांदाच औरंगाबादेत
  • पुर्ण ताकतीनिशी विकासासाठी प्रयत्न करेल
  • बेरोजगारीवर मात करण्यासाठी हे नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करेल

औरंगाबाद : शहराची पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आता समांतर ऐवजी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नवीन लाईन टाकण्यात येणार आहे. आचार संहितापुर्वीच यांची मंजुरी केली जाणार आहे. या विषयी मंत्रीमंडळाच्या विस्तरांनंतर मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली आहे. अशी माहिती उद्योग, खाणीकर्म, अल्पसंख्याक विकास, वक्‍फमंत्री अतुल सावे यांनी रविवारी (ता. 23) माध्यमांना सांगितले. 

राज्यमंत्री मंडळात संधी मिळालेल्या आमदार अतुल सावे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच औरंगाबादेत आले. भाजप शहर कार्यकारिणीतर्फे राज्यमंत्री सावे यांच्या स्वागतासाठी नगरनाका ते राजाबाजार दरम्यान वाहन रॅली काढण्यात आली होती. संस्थान गणपतीच्या आरतीने या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर त्यांनी पुंडलिकनगरात नागरिकांशी संवाद साधला. सावे म्हणाले, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी विश्‍वास दाखवून राज्यमंत्र्यची जबाबदारी दिली आहे. तिला खरे उतरेल. यासह माझ्या खात्याअंतर्गत पुर्ण ताकतीनिशी विकासासाठी प्रयत्न करेल. 
शहराच्या ज्वलंत असलेला पाण्याचा प्रश्‍नाबाबत मंत्रीपदाची शथपचे तिसऱ्या दिवशीच नगरविकास खात्यांच्या सचिव मनिषा म्हैसेकर यांच्याकडे बैठक लावून समातंतरा ऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन पाईप टाकून पाणी प्रश्‍न सोडविण्यात येणार आहे. दोन महिन्याच्या आत यांचे टेंडर निघेल, यासाठी पुर्णपणे प्रयत्न करेल. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली हा प्रश्‍न सोडविण्यात यशस्वी होईल. औरंगाबाद हे उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे डीएमआयसी व ऑरिकच्या माध्यमातून नवीन उद्योग आणणार आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी हे नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करेल. अल्पसंख्याकांच्या संख्या मोठी प्रमाणावर असल्याने त्यांच्या विकासकडे लक्ष देणार आहे. शहरातील समांतर प्रश्‍न न्यायालयात गेल्यामुळे या प्रकरणात कोर्टबाजी करण्याऐवजी सरळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यामतून हा प्रश्‍न सोडविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. यात सातारा, देवळाईसह संपुर्ण शहराचा समावेश असणार आहे. यासाठी 1500 कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे सांगितले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अनिल मकरिये उपस्थित होते. 

सेनेवर कुरघोडी -
शिवसेनेने आलेली समांतराला टक्‍कर देण्यासाठी आता भाजपतर्फे खेळी केली जात आहे. म्हणूनच समांतर ऐवजी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. राज्यमंत्रीपद देऊन महापालिकेत भाजपची ताकत वाढविण्यासाठीचा हालाचाली होत आहे. 

सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सावेचा सत्कार -
राज्यमंत्री अतुल सावे यांची रॅली काढून शहरात स्वागत करण्यात आले. क्रांती चौकातून पैठण गेटकडे जाताना शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडून सावे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुडंलिकनगरात शिवसेना पुर्व विधानसभेचे संघटक राजू वैद्य यांच्याकडूनही सावे यांचा सत्कार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instead of parallel the new Pipeline of Maharashtra Jeevan Pradhikaran says Minister of State Atul Saawe