तब्बल 60 शाखांचे एकत्रिकरण; अशी आहे देना, विजया आणि बडोदाची मराठवाड्यातील स्थिती

प्रकाश बनकर
सोमवार, 1 एप्रिल 2019

देना आणि विजया बॅंकेच्या मराठवाड्यातील 30 शाखांचे बॅंक ऑफ बडोदात विलनीकरण झाले आहे. 

औरंगाबाद : केंद्र सरकारतर्फे सहा राष्ट्रीयीकृत बॅंकांचे विलीनीकरण झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये आता देना, विजया बॅंकेचे बॅंक ऑफ बडोदा मध्ये विलीन करण्यात आले आहे. देना आणि विजया बॅंकेच्या मराठवाड्यातील 30 शाखांचे बॅंक ऑफ बडोदात विलनीकरण झाले. मराठवाड्यात या तिन्ही बॅंकाचे एकूण 60 शाखा आहे. तर राज्यात देना आणि विजयाच्या 504 शाखा आता बॅंका आता बॅंक ऑफ बडोदा म्हणून ओळखल्या जाणार आहे. या विलनीकरणानंतर भारतीय स्टेट बॅंकेच्या नंतर बॅंक ऑफ बडोदा देशातील सर्वांत मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक बनली आहे. 

एप्रिल 2017 मध्ये 'स्टेट बॅंक ऑफ पटियाला', 'स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर', 'स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर', 'स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद', 'बॅंक ऑफ बिकानेर ऍण्ड जयपूर' आणि 'भारतीय महिला बॅंक' या सहा बॅंकांचे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले. यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये केंद्र सरकारने या तीन बॅंकांचे विलीनीकरण करीत एक मोठी बॅंक सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. 1 एप्रिल ला देना आणि विजया बॅंकाचे बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्यात आल्या. गेल्या सहा महिन्यापासून ही प्रक्रीया सुरु होती. या तिन्ही बॅंकेच्या मराठवाड्यात 60 शाखा आहेत.

विलीनीकरणानंतर या शाखेत बॅंक ऑफ बडोदाची पाटी लागणार आहे. अनेक वर्षांपासून या तिन्ही बॅंकांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. 60 शाखांपैकी नव्या किती शाखा स्थापन होईल यांची माहिती बॅंकेतर्फे लवकरच जाहिर केली जाणार आहे. 

  • राज्यातील स्थिती -
    बॅंक ऑफ बडोदा - 505 
    विजया बॅंक - 176 
    देना बॅंके -  328 

 

  • तिन्ही बॅंकांची मराठवाड्यातील स्थिती -

     

शहर देना बॅंक विजया बॅंक बॅंक ऑफ बडोदा 
औरंगाबाद 2 3 12
जालना 1 2 3
लातूर 3 1 4
नांदेड 7 1 4
बीड 3 1 2
परभणी 2 1 3
हिंगोली 1 1 1
उस्मानाबाद 1 0 1
       
एकूण 20 10 30

 

Web Title: Integration of 60 bank branches Dena Vijaya and Barodas status in Marathwada