आंतरराज्यीय वॉन्टेड आरोपी अटकेत

उमेश वाघमारे
सोमवार, 30 एप्रिल 2018

शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील बँक कॉलनी येथे संशयित वॉन्टेड आरोपी शेख इकबाल शेख शफी अहेमद या गावठी पिस्तूलसह फिरत आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती.

जालना - राज्यातील विविध जिल्ह्यात विविध गुन्हे करुन फरार असलेला शेख इकबाल शेख शफी अहेमद ( वय 28, रा. गेवराई) या वॉन्टेड आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (ता. 29) रात्री उशिरा अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्टलसह एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील बँक कॉलनी येथे संशयित वॉन्टेड आरोपी शेख इकबाल शेख शफी अहेमद या गावठी पिस्तूलसह फिरत आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. त्यानुसार बँक कॉलनी येथे पोलिस निरीक्षक श्री. गौर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचुन संशयित आरोपी शेख इकबाल शेख शफी अहेमद याला अटक केली. 

संशयित वॉन्टेड आरोपी शेख इकबाल शेख शफी अहेमद याच्या विरिधात गेवराई, परभणी, नानापेठ, बीड, औरंगाबाद या सह राज्यातील विविध पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, घरफोड्या, चोऱ्या, पाकिटमारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. सुमारे वीस दिवसांपूर्वी शेख इकबाल शेख अहेमद याने औरंगाबाद जिल्ह्यातील जंगीर बाबा जतत्रेमध्ये दोन फायर केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Interstate wanted accused arrested