Jalna News : अवैध सावकारीच्या नव्वद तक्रारींची चौकशी

जालना : ३४२ अर्जात आढळले नाही तथ्य, ५४ हेक्टरवर मालमत्ता अर्जदारांना परत
Investigation of ninety complaints of illegal moneylenders Jalna
Investigation of ninety complaints of illegal moneylenders Jalnasakal

जालना : बँकांनी कर्ज नाकारल्यानंतर अनेकांना सावकाराशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे गावात जो व्याजाने पैसे देईल, त्याच्याकडून शेत जमिनी गहाण ठेवून व्याजाने पैसे घेऊन नड भागविण्याची अनेकांवर वेळ येते.

मात्र, हे कर्ज फेडताना कर्जापेक्षा अधिक रक्कम भरली तरी देखील जमिनीला मुकण्याची वेळ आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे अवैध सावकारीच्या तक्रारी येतात. आजघडीला तब्बल नव्वद तक्रारींची चौकशी सुरू आहे.

तर आत्तापर्यंत ५२ तक्रारदारांची ५४ हेक्टर २९ आर मालमत्ता अवैध सावकारीच्या कचाट्यातून प्रशासनाने सोडवून परत केली आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही शेकडेवारीवर पैसे देणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

त्यामुळे बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर आजही बहुसंख्या लोक अवैध सावकारी करणाऱ्यांकडून पाच ते दहा रुपये शेकड्यापर्यंत व्याजाने पैसे घेतात. यात प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर, तरुण वर्गाचा अधिक समावेश आहे.

विशेष म्हणजे हे कर्ज घेताना अवैध सावकाराकडून शेत जमीन किंवा राहत्या घराचे खरेदीखत करून घेण्याचे प्रकार काही ठिकाणी चालतात. या सावकारी कचाट्यात अडकल्यानंतर व्याजाने घेतलेल्या मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम व्याजात दिली तरी ही कर्ज फिटत नाही.

त्यामुळे शेत जमीन किंवा घाण ठेवलेल्या घर या व्याजाच्या पैशात जाण्याची वेळ येते. तेव्हा अनेकांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दार ठोठावले जाते. मागील आठ वर्षात जिल्ह्यात अवैध सावकारीचे ४९८ तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत.

त्यापैकी ३९९ तक्रारीची चौकशी पूर्ण झाली आहे. यामध्ये ५७ अवैध सावकारी तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. तर तब्बल ३४२ अवैध सावकारी तक्रारीत तथ्‍य आढळून आले नाही. डिसेंबर अखेरपर्यंत ५२ तक्रारदारांना ५४ हेक्टर २९ आर जमीन परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

तर आजघडीला ९० अवैध सावकारीबाबतच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. यात सर्वाधिक जालना तालुक्यातील ५० तक्रारीची चौकशी सुरू आहे. या तक्रारीच्या चौकशीअंती निकाल लागले. मात्र, आजही सावकारी पाशात अडकणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे.

आठ महिन्यात ३६ तक्रारी

जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मागील जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ३६ अवैध सावकारीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यात आठ तालुक्यातून अवैध सावकारीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com