esakal | सावधान! निष्काळजीपणाने वाहन चालवणाऱ्या चालकांवर बसणार चाप
sakal

बोलून बातमी शोधा

निष्काळजीपणाने वाहन चालवणाऱ्या चालकांवर होणार आता कारवाई

सावधान! निष्काळजीपणाने वाहन चालवणाऱ्या चालकांवर बसणार चाप

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : रस्त्याने निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांवर आता चाप बसणार आहे. या करिता उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (Regional Transport Offficer) व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे. यावर अशा वाहन चालविणाऱ्यांची माहिती फोटोसह नागरिकांना टाकल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. (IAS Prithviraj BP) यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक झाली होती. लातूर (Latur) जिल्ह्यातील वाढत्या अपघाताच्या प्रमाणाबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली होती. अपघात टाळण्यासाठी व प्रमाण कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने मोबाईल व्हॉट्सॲप क्रमांक देण्यात यावा, ही नावीन्यपूर्ण कल्पना जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सुचवली होती.(irresponsible driving to be undercontrol by rto in latur glp88)

हेही वाचा: अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना लस न घेतल्यास पगार थांबणार

या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आता सर्वसामान्य नागरिकांसाठी ९६९९४०३७७६ हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात एखादे वाहन धोकादायकरीत्या वाहतूक नियमाचे उल्लंघन करून चालवताना आढळल्यास, एखाद्या ठिकाणी अपघात झाला असल्यास अथवा अपघात होण्याची शक्यता असल्यास तसेच रस्त्यावरील रस्ते विषयक रचना अपघातास कारणीभूत ठरेल असे वाटत असेल तर त्याबाबत सविस्तर माहिती व सूचना वरील व्हॉट्सअॅप क्रमांकावर छायाचित्रासह पाठवावी. त्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास अपघातग्रस्त वाहनास व संबंधित व्यक्तीला लवकरात-लवकर मदत दिली जाणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी केले आहे.

loading image