जलसिंचन विभागाच्या मुख्य अभित्यांनी बह्मगव्हाण सिंचन योजनेची केली पाहणी

गजानन आवारे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

जायकवाडी (जि.औरंगाबाद ) : पैठण तालुक्‍यातील 55 गावांसाठी भगीरथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अशोक आव्हाड यांनी मंगळवारी (ता. एक) पाहणी करून समाधान व्यक्त करीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना येत्या रब्बी हंगामात खेर्डा प्रकल्पात पाणी नेण्याचे आदेश दिले. यावेळी कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, उपकार्यकारी अभियंता मयूरा जोशी, उपकार्यकारी अभियंता अमोल मुंडे, सोनई कन्स्ट्रक्‍शनचे रमेश अहिरराव, रविराज मराठे, श्रीहरी कन्स्ट्रक्‍शनचे शेखर शेलार, शाखा अभियंता शिरीष देशमुख, युवराज बाविस्कर, प्रशांत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुख्य अभियंता आव्हाड म्हणाले, की ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेची कामे प्रगतिपथावर असून खेर्डा प्रकल्पापर्यंत कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता कमी पडू देणार नाही व येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल. यावेळी त्यांनी जायकवाडी धरणालगत असलेल्या पंपगृहासह सुरू असलेल्या पाइपलाइनचे काम, पाणी वितरण कुंड, कालवा क्रमांक एक व दोन यांची थेट कामावर जाऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेची उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती लवकरच पूर्ण होऊन येत्या रब्बी हंगामात कुठल्याही परिस्थितीत खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचणार आहे. त्यामुळे परिसरात त्यांचा सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होईल. सध्या जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांत आनंद असून तेच पाणी खेर्डा प्रकल्पात येणार आहे.
- अनिल निंभोरे, कार्यकारी अभियंता

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Irrigation Department Chief Engineer Visit Bramhagavhan Project