सिंचनाचा अनुशेष व्हावा दूर, ‘जलयुक्त’ला हवीय गती

सिंचनाचा अनुशेष व्हावा दूर, ‘जलयुक्त’ला हवीय गती

जालना - कायम दुष्काळाचा सामना करीत आलेल्या जालना जिल्ह्यात वर्ष २०१६ मध्ये सामाधानकारक पाऊस झाला. जलयुक्त शिवारमधून झालेली कामे, त्याला मिळालेली लोकसहभागाची साथ जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र व जमिनीची पाणीपातळी वाढण्यास उपयुक्त ठरली; परंतु अभियानाची गती पाहता मागील वर्षी मंजूर काही कामे अद्यापही प्रलंबित आहेत. या वर्षीची बहुतांश कामे प्रशासकीय मान्यतेच्या फेऱ्यात अडकली आहे.

लोकचळवळ बनू पाहत असलेल्या या अभियानाला गरज आहे ती गती आणि गुणवत्तेची. पाण्यासाठी खेडोपाडी होणारी पायपीट पाहता परतूर, मंठा तालुक्‍यातील १८६ गावांमध्ये होत असलेल्या ग्रीड पाणीपुरवठा योजना अन्य तालुक्‍यांमध्येही राबवायला हवी. महत्त्वाचे म्हणजे सिंचनाचा भौतिक अनुशेष पूर्ण करणे गरजेचे आहे.

पाणीपुरवठा 
जालन्यातील निजामकालीन जलवाहिनीला गळती
गळतीमुळे पाण्याचा अपव्यय व वाढत्या आरोग्य समस्या 
ग्रामीण भागात बहुतांश गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना नाही
अनेक गावे विहिरीच्या पाण्यावर अवलंबून
वॉटर ग्रीडमुळे परतूर, मंठ्यातील गावांचा पाणीसमस्या सुटणार

अपेक्षा
जालना अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याची गरज
मंठा, परतूरप्रमाणे अन्य तालुक्‍यातही वॉटर ग्रीड योजनेची अंमलबाजणी
पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आर्थिक नियोजनाची गरज
शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यास प्राधान्य देण्याची गरज
बंद पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी हवे नियोजन

जलयुक्त शिवार  
पहिल्या वर्षी काम झालेली गावे २१२ दुसऱ्या टप्प्यातील गावे १८६ 
कामामुळे झालेला पाणीसाठा ४९ हजार ५५० टीसीएम
सिंचनाखाली येणारे क्षेत्र ४९५५० हेक्‍टर, पाणीपातळीत वाढ दोन मीटर
वर्ष २०१६-१७ मधील प्रस्तावित कामे चार हजार ६८०
मंजुरी मिळालेली कामे ११३०, पूर्ण झालेली कामे ३७३

अपेक्षा
जलयुक्तच्या कामांसाठी प्रत्येक विभागामध्ये समन्वयाची गरज
केवळ गुत्तेदारीसाठी कामे नको, ई-टेंडरिंग ही कामे वेळेत व्हायला हवी
कामांची गती आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्‍यकता
झालेल्या कामांची तपासणी व अंकेक्षण होण्याची गरज
अधिकाधिक गावांना शासकीय पोकलेन उपलब्ध करून देण्याची गरज

सिंचन प्रकल्प 
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांची संख्या ६४
यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये ५८.८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा
सिंचनाखालील क्षेत्र एक लाख २४ हेक्‍टर
सिंचन क्षमतेची टक्केवारी २३.०६
लघुपाटबंधारे विभागाच्या ४५ प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

अपेक्षा
सिंचन प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नियोजन व आर्थिक तरतूद 
सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य हवे
निधीमुळे ठप्प झालेल्या कामांसाठी आर्थिक तरतूद हवी
अधिकारी, कर्मचाऱ्यांची ४० टक्के रिक्त पदे भरण्याची गरज
सिंचनाचा आर्थिक अनुशेष संपला असला तरी भौतिक अनुशेष अद्याप अपूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com