
परळी वैजनाथ : शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या स्वाती, ज्योती आणि प्रिती गावच्या जिल्हा परिषदे शाळेत शिकुन आज जपान, मलेशियातील सिंगापूर आणि अमेरिका सारख्या प्रगत देशात नोकरी करुन आईवडीलांचेच नव्हे तर, मराठवाड्याचे नाव रोषण करत आहेत. परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील थोंटे परिवारातील स्वाती, ज्योती व प्रिती या तिघींची यशोगाथा ग्रामीण महिला व मुलींसाठी
नक्कीच प्रेरणादायी आहे.
गाढे पिंपळगाव येथील वैजनाथ त्रिंबकअप्पा थोंटे हे शेतकरी असून त्यांना स्वाती, ज्योती व प्रिती तीन मुली व दोन मुले. तिघींचे पहिली ते माध्यमिक शिक्षणही गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. गावात शिक्षण संपले आता पुढे काय असा प्रश्न असतानाच स्वातीने हम्मत करुन नांदेडच्या गुरुगोविंदसिंह अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी वडीलाना गळ घातला. वडिलांनी मोठ्या विश्वासाने तीला नांदेडला पाठविले तीने वडीलांचा विश्वास सार्थ ठरवत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे लग्न केले. विवाहानंतर ती पती सोबत जपानला स्थाईक झाली. तिचे शिक्षण तिच्या कामी आले तिने एका बहूराष्ट्रीय कंपनीत नौकरीस सुरुवात केली. मागील १६ वर्षापासून ती याच कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे.
हेही वाचा- फौजदार ‘रुपाली’ यांचा साहसी प्रवास
स्वातीच्या पावलावर पाऊल
तर दुसरी मुलगी ज्योतीनेही देखील स्वातीच्या पावलावर पाऊल ठेवत शिक्षणासाठी लातूरची वाट'धरली होती. तिने ही लातूरच्या पुरणमल लाहोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी मिळविली. शिक्षणपूर्ण झाल्याने आईवडीलानी कर्तव्य पार पाडले. आणि ज्योतीला देखील सिंगापूरमध्ये नौकरी, धंदा करत असलेला जावई शोधला आणि मुलिचे लग्न करुन दिले. सध्या ज्योती मागील दहा वर्षांपासून उच्च पदावर कार्यरत आहे. तिसऱ्या प्रितीनेही आंबेजोगाईच्या कला महाविद्यालयात गृह विज्ञानाची पदवी मिळविली. सध्या ती अमेरिकेत नोकरीला आहे.
शेतकरी आईवडीलांच्या कष्टाचे चिज झाले
आई सिमा व वडील वैजनाथ थोंटे यांनी मेहनत आणि कष्टाने शेती उत्पन्नातून शिक्षण दिलेल्या या तिघींने त्यांचे पांग फेडले. त्यांचा मुलगा निशीकांतनेही अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण करुन तो जपानला बहूराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत आहे. तर दुसरा मुलगा प्रशांतचे परळीत कापड दुकानाचा व्यवसाय आहे.
स्वाती बनली बहिणींची प्रेरणा
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठविणे म्हणजे पालकांच्या अंगावर काठा येई. त्यावेळी सर्वात मोठी बहिण असलेल्या स्वातीला थोंटे कुटूंबियांनी नांदेडला अभियांत्रिकी शिक्षणासाठी पाठवले. स्वातीने आपल्या वडीलांचा विश्वास पात्र ठरवला. त्यानंतर कुटूंबाचा विश्वास वाढला आणि दुसऱ्या दोघींनाही अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी बाहेर ठेवले. आता या तिघीही परदेशात नोकरी करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.