आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार अमेरिकत नोकरी 

संदीप लांडगे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

 औरंगाबाद - आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आता अमेरिकेतील एका कंपनीने रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. उत्तर अमेरिकेतील एडवर्ड कंपनीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी नुकतीच येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

औरंगाबाद - आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आता अमेरिकेतील एका कंपनीने रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. उत्तर अमेरिकेतील एडवर्ड कंपनीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी नुकतीच येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

रेल्वेस्टेशन रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे मंगळवारी (ता. सहा) अमेरिकेतील एडवर्ड कंपनीचे अध्यक्ष मार्क एडवर्डस्‌ यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत एडवर्ड कंपनीचे आठ पदाधिकारीही आले होते. प्रसंगी त्यांनी तांत्रिक काम करण्यासाठी आयटीआय संस्थेला शंभर गॉगल्स भेट दिले. 
उत्तर अमेरिकेत 1961 पासून एडवर्ड कंपनी दळणवळण व पायाभूत सविधा पुरविते. या कंपनीचे मालक मार्क एडवर्डस्‌ जानेवारी 2019 मध्ये औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी रेल्वेस्टेशन रोडवरील आयटीआय प्रशिक्षण संस्थेला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी आयटीआयध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध औद्योगिक प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली होती. या औद्योगिक प्रशिक्षणाबाबत प्रभावित होऊन मार्क एडवर्डस्‌ अमेरिकेत जाऊन त्यांच्या कंपनीतील कामगारांना या प्रशिक्षण संस्थेबद्दल माहिती दिली. 

कंपनीच्या कामानिमित्त सोमवारी पुन्हा ते दिल्लीला कुटुंबासह आले होते. त्यानंतर त्यांनी मंगळवारी औरंगाबादच्या आयटीआय संस्थेस भेट दिली. भारतात आयटीआय संस्थेत विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध पद्धतीने औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते याची माहिती त्यांनी सोबत आलेल्या सहकाऱ्यांना दिली. यावेळी त्यांनी मशिनिस्ट, टर्नर, ग्राईंडर, वेल्डर, फिटर या ट्रेड्‌सच्या प्रशिक्षणवर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी विविध मशिनरीविषयी तब्बल सहा तास चर्चा केली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेतून त्यांनी शंभर गॉगल्स आणले होते; तसेच ऍडवर्ल्ड ऑटोमोबाईल्स कंपनीचे कट सेक्‍शन डिझाईन मॉडेल्सही विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. 
 
मुलाखती पुढील वर्षी 
मार्क एडवर्डस्‌ यांनी येथील विद्यार्थ्यांना दोन फ्लॅश ड्राईव्ह, कंपनी वर्कशॉप, प्रोजेक्‍टच्या सीडी, सेफ्टी फ्रिक्वेशन, हॅंडबुक असे साहित्यांचे कीट दिले. पुढील सहा महिन्यांत जे विद्यार्थी योग्य प्रशिक्षण घेतील, त्यांना अमेरिकेत नोकरीची संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखती घेण्यासाठी ते जानेवारी 2020 मध्ये पुन्हा औरंगाबादला येणार असल्याचे आयटीआयचे प्राचार्य ए. ए. अल्टे यांनी सांगितले. प्रसंगी मार्क एडवर्डस्‌ यांची पत्नी, मुलगा इतर सहकारी; तसेच आयटीआय संस्थेचे एस. व्ही. भोसले, व्ही. एस. परदेशी, आर. एल. कुलकर्णी, डी. बी. खंडागळे, ए. पी. गायदर, डी. जी. मारवाडकर, पी. डी. जुंगे, आर. के. भाटणकर यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI students get jobs in US