आयटीआयच्या नव्या ट्रेडला दीड वर्षापासून निदेशक मिळेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

लातूर - देशभरात कौशल्य विकासाचा डंका पिटला जात असला तरी परंपरेने कौशल्य विकासाची शिकवण देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अनेक ट्रेडसाठी निदेशक मिळत नसल्याची स्थिती आहे. अशीच अवस्था नव्याने सुरू झालेल्या ‘ऑपरेटर ॲडव्हॉन्स मेकॅनिकल टुल्स‘ या ट्रेडची झाली असून येथील आयटीआयमध्ये हा ट्रेड सुरू झाल्यापासून दीड वर्ष झाले तरी त्यासाठी निदेशक उपलब्ध झालेला नाही. यामुळे काही विद्यार्थी ट्रेड सोडून गेले तर उर्वरित या ट्रेडच्या दोन सेमीस्टरमध्ये नापास झाले आहेत.

कौशल्य विकासातून तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. यातूनच विविध कौशल्य विकासाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या स्थितीत परंपरेने विविध व्यवसायाच्या कौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्या आयटीआयची सध्या निदेशकाअभावी दयनीय अवस्था झाली आहे. आयटीआयमधील अनेक नव्या व जुन्या ट्रेडसाठी निदेशक उपलब्ध नाहीत. अनेक निदेशकांच्या जागा रिक्त आहेत. या स्थितीत अनेक ट्रेडचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी बोटावर मोजण्याइतपत शिल्लक राहिलेल्या निदेशकांवर आली आहे. एका ट्रेडचे निदेशक अनेक ट्रेडचे प्रशिक्षण देताना दिसत आहेत. पदवीकाधारक उमेदवारांना तासिका तत्वावर नियुक्त करण्याचा प्रयत्न होत असला तरी केवळ ७२ रुपये प्रति तासिका मानधन मिळत असल्याने त्यांचाही प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. यातूनच अनेक ट्रेडला निदेशक नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या ऑपरेटर ॲडव्हॉन्स मेकॅनिकल टुल्स या ट्रेडला निदेशक अजून उपलब्ध झाला नाही. या ट्रेडची पुस्तकेही बाजारात उपलब्ध नाहीत. पालकांनी पुण्यापर्यंत जाऊन शोध घेतला तरी त्यांना पुस्तके हाती लागली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. निदेशकांसाठी ओरड करणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांना तासिका तत्त्वावर तुम्हीच एखादा निदेशक शोधून आणण्याचा सल्ला दिला जात आहे.

रिक्त जागा भरण्याची मागणी

याबाबत आयटीआयचे प्राचार्य बी. एस. गायकवाड म्हणाले की, संस्थेत तीस निदेशकांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्याची व विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता चाळीस रुपयांहून पाचशे रुपये करण्याची मागणी कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे केली आहे. लवकरच निदेशकांच्या रिक्त जागा भरल्या जातील. नवीन ट्रेडसाठी तातडीने निदेशकाची व्यवस्था करण्यात येईल.

Web Title: ITI will get a half years, the new director of the Trade