लग्नाचा समारंभ रद्द करून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मदत

jadhav family canceled a wedding ceremony and helped families of martyrs
jadhav family canceled a wedding ceremony and helped families of martyrs

औरंगाबाद : ग्वाल्हेर येथे ता. 13 फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. रविवारी (ता. 17) औरंगाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, तर बुधवारी (ता. 20) शिऊर (ता. वैजापूर) येथे स्वागत समारंभ होता. त्याची सर्व तयारीही झाली; पण अचानक पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. त्यामुळे जिल्ह्यातील जाधव कुटुंबीयांनी रिसेप्शनचे नियोजित दोन्हीही कार्यक्रम रद्द करीत त्यावरील खर्च होणारे 15 लाख रुपये रविवारी (ता. 17) हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी दिले. 

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांचा मुलगा अभिषेक यांचा 13 फेब्रुवारीला ग्वाल्हेर येथे विवाह झाला. यानंतर रविवारी पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ होणार होता. यासाठी बुकिंग व इतर व्यवस्थाही पूर्वीच करून करण्यात आली होती. यासह 20 फेब्रुवारीलाही त्यांच्या मूळगावी शिऊर (ता. वैजापूर) येथील शेतात दुसरा स्वागत समारंभ ठेवण्यात आला होता. हे दोन्ही समारंभ पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर रद्द करण्यात आले. या समारंभासाठी 15 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. हा खर्च वाचवून ही रक्कम एकनाथ जाधव कुटुंबीयांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांच्यामार्फत हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दिली. 

पंचतारांकित हॉटेलात रिसेप्शनचे बुकिंग केले होते; परंतु जवानांवरील हल्ल्यामुळे रिसेप्शन रद्द केले आहे. हॉटेलला दिलेल्या एकूण रकमेपैकी रद्द शुल्क कपात करून त्यांच्याकडून उर्वरित पैसे परत करण्याची मागणी केली आहे. रविवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांच्याकडे 15 लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला. 
- एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com