जडीबसवलिंगेश्‍वर महास्वामींवर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

महाराष्ट्रासह व कर्नाटकातील हजारो भाविक, शिष्यांची उपस्थिती 

केसरजवळगा - गावातील मठाचे दुसरे मठाधिपती जडीबसवलिंगेश्वर महास्वामी यांच्यावर शनिवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास ३६ महास्वामी आणि महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत मठामध्येच विधिपूर्वक (लिंगैक्‍य) अंत्यसंकार करण्यात आले. 

जडीबसवलिंगेश्वर महास्वामी यांचे शुक्रवारी (ता. २०) निधन झाले. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महास्वामींची वाजत-गाजत हजारो भक्तांच्या उपस्थितीत सकाळी साडेअकराच्या सुमारास मठापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

गावातील प्रमुख मार्गावरून ही पालखी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मठात आली. त्यानंतर ३६ महाराजांच्या उपस्थितीत विधीप्रमाणे पूजा करून महास्वामींवर पाचच्या सुमारास अंत्यसंकार करण्यात आले. या वेळी शांतलिंग महास्वामी (दुधनी), शंभुलिंग शिवाचार्य (उदगीर), बसवलिंग महास्वामी (अक्कलकोट), सिद्धेश्वर महास्वामी (लोहारा), गुरूमहंत स्वामी (नरोणा), शिवानंद महास्वामी (शिवनी), शंभुलिंग शिवाचार्य (सिंदकेरा), शिवयोगी शिवाचार्य (अणदूर), गंगाधर महास्वामी (जेवळी), कासलिंग महाराज (जेऊर), गुरुलिंग महास्वामी (सुलपेठ), चन्नमल्ल देवरू (हुडगी), शिवलिंग देवरू (बिळगी), गुरुलिंग शिवाचार्य (बंगरगा), शांतलिंग महास्वामी (मादन हिप्परगा), मुरगेंद्र शिवाचार्य (सिरशाट), शंकरलिंग महास्वामी (वागदरी), आमदार बसवराज पाटील, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे, माजी आमदार सुभाष गुत्तेदार (आळंद, कर्नाटक), बसवराज वरनाळे, बापूराव पाटील, ॲड. राजू पाटील यांच्यासह सोलापूर, पुणे, गुलबर्गा, बिदर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आदी जिल्ह्यांतील हजारो भाविक उपस्थित होते. बाहेरगावावरून आलेल्या भाविकांसाठी आमदार चौगुले यांच्यासह गावातील मुस्लिम समाजातील नागरिक, हॉटेलचालकांकडून मोफत उपाहाराची सोय करण्यात आली होती.

महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी व दर्शनासाठी गावात सकाळपासूनच हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांनी गुलबर्गा व आळंद गावांतील भाविकांसाठी कर्नाटक आगाराच्या १२ बस केसरजवळग्याला सोडल्या होत्या. परिसरातील अनेक जिल्ह्यांत महाराजांचे गाव म्हणून केसरजवळग्याची ओळख होती. महास्वामींच्या निधनाने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: jadibasavlingeshwar mahaswami last rites