जाफराबाद : कृषि अधिकाऱ्यास सहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

सदर विहीरी वरती कठाडे बांधकामाते शासनातर्फे 50 हजार रुपयाचे बिल मिळणे बाकी होते.
bribe
bribe sakal

जाफराबाद : येथील पंचायत समितीतील कृषि अधिकारी प्रदीप महादेव जाधव (वय 57, रा.काराटी ता.बारामती) यांना सहा हजार रुपयांची लाच घेतांना ता.13 (बुधवारी) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचायत समितीत रंगेहाथ पकडले.

डॅा.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत गाडेगव्हाण ता.जाफराबाद येथील गट क्रमांक 75 मध्ये नवीन विहीर तक्रारदाराच्या बहीणीच्या नावाने मंजुर झाली होती.त्या विहीरीला 2,50,000/- अनुदान देण्यात आले असुन तक्रारदार यांच्या बहीणीच्या शेतामध्ये खोदकाम करुन सदर बांधकाम बाबतचे दोन लाख बिल पुर्वीच काढले होते.सदर विहीरी वरती कठाडे बांधकामाते शासनातर्फे 50 हजार रुपयाचे बिल मिळणे बाकी होते.

आलोसे यांनी तक्रारदाराकडे विहिर खोदकाम करण्यासाठी यापूर्वी काढलेले दोन लाख रुपये बिलाचे व सध्या सदर विहिरीचे कठडे बांधकामाचे 50 हजार रुपयांचे बिल काढून देणे या दोन्ही कामासाठीचे 10 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 6,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून पंचायत समिती कार्यालय जाफराबाद येथे 6,000/- रुपये लाच स्वीकारतानापंचा समक्ष रंगेहात पकडण्यात आले असून आलोसे यांच्या वरती गुन्हा नोंद करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे.

पोलीस अधिक्षक राहुल खाडे,अपर पोलीस अधिक्षक विशाल खांबे,पोलीस उप अधिक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर,पोलीस अमंलदार गजानन घायवट, गजानन कांबळे ,गणेश भुजाडे, मनोहर खंडागळे, प्रवीण खंदारे यांनी सापळा रचुन कृषि अधिकारी जाधव यास लाच स्विकारतांनी रंगेहाथ पकडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com